एक्स्प्लोर
Advertisement
Coronavirus | हँड सॅनिटायझर अन् मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार : राजेंद्र शिंगणे
कोरोना व्हायरसमुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेत अनेकजण हँड सॅनिटायझर आणि मास्कचा काळाबाजार करत आहे. याची गंभीर दखल शासनाने घेतली असून अशा लोकांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आज दिला.
मुंबई : हँड सॅनिटायझर आणि मास्कचा अत्यावश्यक गोष्टींमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे परिस्थितीचा गैरफायदा घेत कमी दर्जाचे सॅनिटायझरची विक्री करणारे आणि त्याचा साठा करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आज दिला. मागच्या आठ दिवसात राज्यात 22 ठिकाणी या अंतर्गत कारवाया केल्याची माहिती शिंगणे यांनी दिली. सोबतच सॅनिटायझरचा अतिवापर त्वचेसाठी हानिकारक असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात हँड सॅनिटायझर आणि मास्कचा तुटवडा निर्माण झाल्याने इतर राज्यातून याची मागणी केल्याचंही मंत्री म्हणाले.
राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मास्क आणि हँड सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी सांगितले जात आहे. परिणामी लोक मोठ्या प्रमाणात हँड सॅनिटायझर आणि मास्कची खरेदी करत आहे. त्यामुळे बाजारात मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर, या परिस्थितीचा गैरफायदा घेत अनेकांनी कमी दर्जाचे हँड सॅनिटायझर आणि मास्क बाजारात आणले जात आहे. याची गंभीर दखल सरकारने घेतल्याचे राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले आहे.
तर, कायदे आणखी कडक करणार
राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेत अनेकांनी हँड सॅनिटायझर आणि मास्कचा साठा करत बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण केला आहे. त्याविरोधात सरकार आता कडक कारवाई करणार असल्याचा इशारा राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे. अन्न व औषध प्रशासना अंतर्गत यावर चर्चा झाली. मागच्या आठ दिवसात अन्न व औषध प्रशासनाने राज्यात 22 ठिकाणी कारवाया केल्या आहेत. तर, लोकांनीही गरज नसताना या वस्तूंचा साठा केल्यानेही तुटवडा निर्माण झाल्याची माहिती शिंगणे यांनी दिली. त्यामुळे अशा नागरिकांवरही कारवाई केली जाणार आहे.
Coronavirus | पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 9; राज्यात एकूण 42 कोरोनाग्रस्त
राज्याचा आकडा 42 वर
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. तरी कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. पुण्यात एक महिला करोनाग्रस्त असल्याचं निदान झालं आहे. त्यामुळं राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा 42 झाला आहे. कोरोना बाधित असलेली ही महिला फ्रान्सहून आली आहे. ती नेदरलँड्सलाही जाऊन आली होती. परदेशातून आल्यामुळं तिची तपासणी करण्यात आली होती. त्यात तिला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. ही महिला ज्या कारमधून आली होती, त्या कारचालकाला आणि तिच्या घरातील मोलकरणीलाही नायडू रुग्णालयात आणण्यात आलं आहे. त्या दोघांचीही चाचणी सुरू आहे.
WEB EXCLUSIVE | 1,82,457 कोरोना बाधितांपैकी 79,881 रुग्ण खडखडीत बरे कसे झाले?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement