महाराष्ट्रात पावसाची दमदार ओपनिंग, गेल्या 24 तासात 27.7 मिमी पावसाची नोंद
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली आहे. राज्यात सरासरी 3.1 मिमी पाऊस पडतो मात्र आज 27.7 मिमी म्हणजे 795 टक्के पावसाची नोंद झाली.
मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाबरोबरच महाराष्ट्रासमोर काल ‘निसर्ग’ चक्रीवादळाचं संकट आलेलं. या वादळाचा धोका कमी झाला असला तरी आता राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली आहे. राज्यात सरासरी 3.1 मिमी पाऊस पडतो मात्र आज 27.7 मिमी म्हणजे 795 टक्के पावसाची नोंद झाली.
राज्याच्या चारही विभागात आज कसा पाऊस पडला?
कोकण-गोव्यात सरासरी 8.6 मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र आज 67.4 मिमी म्हणजे सरासरीच्या 683 टक्के जास्त पाऊस पडला.
मध्य महाराष्ट्रात सरासरी 3.2 मिमी पाऊस पडतो. मात्र आज 36 मिमी म्हणजे सरासरीच्या 1026 टक्के पाऊस पडला.
मराठवाड्यात सरासरी 2.6 मिमी पाऊस पडतो. मात्र आज 6.5 म्हणजे सरासरीच्या 149 टक्के पाऊस पडला.
विदर्भात सरासरी 1.6 मिमी पाऊस पडतो. मात्र आज 17.2 म्हणजे सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडला.
निसर्ग वादळाच्या केंद्रस्थानी असलेल्या जिल्ह्यांमध्ये गेल्या २४ तासात किती पाऊस पडला?
रायगड जिल्ह्यात सरासरीच्या 1455 टक्के पाऊस झाला. 6.6 मिमी सरासरी असताना 102.6 मिमी पाऊस झाला.
रत्नागिरी जिल्ह्यात सरासरीच्या 850 टक्के जास्त पाऊस झाला. 9.9 मिमी ऐवजी 94 मिमी पाऊस बरसला.
सिंधुदुर्गात सरासरी 11 मिमी पाऊस पडतो प्रत्यक्षात 56.8 मिमी पाऊस म्हणजे सरासरीच्या 416 टक्के पाऊस झाला.
मुंबई शहरात सरासरी 4.8 मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात 50.4म्हणजे सरासरीच्या 950 टक्के जास्त पाऊस पडला.
मुंबई उपनगरांमध्येही सरासरी 4 मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात 24.8 मिमी म्हणजे सरासरीच्या 520 टक्के पाऊस पडला.
नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या 1884 टक्के पाऊस झाला. 3.2 मिमी सरासरी असताना 63.5 मिमी. पाऊस झाला.
धुळे जिल्ह्यात सरासरीच्या 5 हजार 869 टक्के पाऊस झाला. 0.9 मिमी सरासरी असताना 53.7 मिमी. पाऊस झाला.
वाशिम जिल्ह्यात सरासरीच्या 4 हजार 899 टक्के पाऊस झाला. 1.4 मिमी सरासरी असताना 70 मिमी. पाऊस झाला.
Raigad Tala | निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातून ग्राउंड रिपोर्ट