एक्स्प्लोर
उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा, राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी
एकीकडे उन्हाचा पारा वाढत असताना सातारा, सांगलीसह कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे उन्हाच्या कडाक्याने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

मुंबई : एकीकडे उन्हाचा पारा वाढत असताना सातारा, सांगलीसह कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे उन्हाच्या कडाक्याने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सांगली आणि सातारा वळवाच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. सांगलीत जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरु असून, काही ठिकाणी गारांचा वर्षावही पाहायला मिळत आहे. साताऱ्यातल्या पाटण तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं वाढत्या तापमानानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी उन्हाळी पिकांचं मात्र मोठं नुकसान झालं आहे. गोव्यासह कोकणातही मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. उक्याड्याने हैराण झालेल्या कोकणवासियांना यामुळे थोडा दिलासा मिळाला असला तरी या पावसात काजू, आंबा यासारख्या उन्हाळी पिकांचं नुकसान झालं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























