एक्स्प्लोर
तापलेल्या रायगडच्या भिरामध्ये पुणे वेधशाळेचं पथक दाखल
रायगड : तापमानामुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं उष्ण ठिकाण ठरलेल्या रायगडमधील भिरा गावात पुणे वेधशाळेचं पथक दाखल झालं आहे. पुढील काही दिवस हे पथक इथल्या तापमानाचा अभ्यास करणार आहे.
रायगड जिल्ह्यातील भिरा गावात मागील आठवड्यापासून 45 अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त तापमानाची नोंद होत आहे. मात्र इथे मंगळवारी तब्बल 46.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
न्यूझीलंडमधील सामोआ बेटावर जगातील सर्वाधिक म्हणजे 49.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. त्यापाठोपाठ भिरा गावाचा क्रमांक लागतो.
भिरामधील तापमानवाढीचं कोडं शास्त्रज्ञांनाही अजून उलगडलेलं नाही. जमीन जर उष्णता शोषणारी आणि उत्सर्जित करणारी असेल, तर तापमानात वाढ होते. पण आम्ही आमचं पथक तिथे पाठवलं आहे, असं पुणे वेधशाळेचे वरीष्ठ संशोधक डॉ. ए के श्रीवास्तव यांनी सांगितलं.
दुसरीकडे सर्वाधिक तापमानाच्या यादीत विदर्भातला अकोला जिल्हा अकराव्या स्थानावर राहिला. इथे 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
सध्या राज्यभर वैशाख वणवा जाणवत असून राज्यातल्या बहुतांश भागाचं तापमान चाळीशीपार गेलं आहे. विदर्भ, मराठवाड्यासह तुलनेने थंड असणारे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे सध्या तापल्याचं चित्र आहे.
संबंधित बातमी
रायगडचा पारा 46.5 अंशांवर, जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक तापमान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement