एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचा 6 किमी नाईट वॉक
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तनचा यात्रेला सुरुवात झाली.
रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'निर्धार परिवर्तनचा' यात्रेनंतर आमदार अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी थेट चालत मुक्कामाचं ठिकाण गाठलं. तब्बल सहा किलोमीटरचं अंतर दोघांनी चालत कापलं.
लोकांची काम करण्यासाठी स्वत: तंदुरुस्त राहणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे संधी मिळाली तर दररोज चार ते पाच किलोमीटर चालतो, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरही नाईट वॉकचा व्हिडीओ शेअर केला आहे.
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तनचा यात्रेला सुरुवात झाली. रायगडावर दिवसभरात दोन सभा झाल्या. त्यानंतर संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी जाताना अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी तब्बल सहा किमी नाईट वॉक केला.
अजित पवार आणि धनंजय मुंडे झपाझप अंतर कापत हसतमुखाने सर्वांशी संवाद साधत होते. दिवसभरांच्या सभांनंतर दोघेही ज्या तडफेने चालत होते ते पाहून भल्याभल्यांना कडाक्याच्या थंडीत घाम फुटला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
ठाणे
Advertisement