Live Updates Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या सभेकडे उद्धव ठाकरेंची पाठ, उद्या शेगावला जाणार नाहीत
Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेचा राज्यातील आज 11 वा दिवस आहे. ही यात्रा विदर्भात दाखल झाली आहे. जाणून घ्या या यात्रेतील अपडेट्स
LIVE
Background
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज विदर्भातील तिसरा दिवस आहे. तर महाराष्ट्रातील यात्रेचा 11 वा दिवस आहे. आज ही यात्रा अकोला जिल्ह्यात असून सकाळी सहा वाजता पातूर येथून या यात्रेला सुरुवात झाली आहे. वाळेगाव मार्गे ही यात्रा बाग फाटा इथे पोहोचणार आहे. बाळापूर तालुक्यातील बाग फाटा इथे आज यात्रेचा मुक्काम असणार आहे. दरम्यान, भारत जोडो यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केलं जात आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज 69 वा दिवस आहे. तर महाराष्ट्रातील यात्रेचा आजचा नववा दिवस आहे. राज्यात भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ही यात्रा हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली आहे. ठिकठिकाणी राहुल गांधींचं स्वागत केलं जात आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज 68 वा दिवस आहे. तर महाराष्ट्रातील यात्रेचा आजचा आठवा दिवस आहे. राज्यात भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ही यात्रा हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली आहे. ठिकठिकाणी राहुल गांधींचं स्वागत केलं जात आहे. काल ही यात्रा हिंगोलीच्या कळमनुरी शहरात दाखल होती. आज ही यात्रेचा कळमनुरी शहरालगत असलेल्या सातव कॉलेजच्या मैदानात थांबली आहे. आजचा दिवस यात्रेचा याठिकाणी विश्रांती असणार आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) 66 वा दिवस, तर महाराष्ट्रातील यात्रेचा आजचा सहावा दिवस आहे. राज्यात भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ही यात्रा काल नांदेड जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यात दाखल झाली आहे. ठिकठिकाणी राहुल गांधींचं स्वागत केलं जात आहे. दरम्यान आज, सकाळी ही भारत जोडो यात्रा दाती फाटा येथून कळमनुरीच्या दिशेने निघाली आहे. त्यांचे स्वागत करण्यासाठी कोल्हापूरवरुन (Kolhapur) दहा हजार नागरिक हिंगोलीत दाखल झाले आहेत. सर्व नागरिक लाल फेटे बांधून राहुल गांधी यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत.
काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) (11 नोव्हेंबर) 65 वा दिवस आहे. तर महाराष्ट्रातील यात्रेचा पाचवा दिवस आहे. ही यात्रा आज हिंगोली जिल्ह्यात पोहोचणार आहे. युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे आज काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. दुपारी चार वाजता आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यात्रेत उपस्थिती लावणार आहे. सकाळी 6 वाजता अर्धापूर, नांदेड येथून यात्रेला सुरुवात झाली आहे. सकाळी 10 वाजता सकाळचा ब्रेक होईल. त्यानंतर दुपारी 4 वाजता चोरंबा फाटा, हिंगोली येथून पुन्हा पदयात्रेला सुरुवात होणार आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज 64 वा आणि महराष्ट्रातील आज चौथा दिवस आहे. सकाळी सहा वाजल्यापासून राहुल गांधी यांच्या पदयात्रेला नांदेडच्या लोहा येथून सुरूवात झाली आहे. दुपारी चार वाजता देगलूर नाका येथून पुन्हा पदयात्रेला सुरूवात होईल. संध्याकाळी सहा वाजता न्यू मुंडा मैदान येथे राहुल गांधीची सभा होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार हे आज या यात्रेत सहभागी होणार आहेत.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रातील तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसातील पहिलं सत्र सकाळी सहाला सुरु झालं आहे. गुलाबी थंडीत राहुल गांधी यांनी सहा वाजता ही यात्रा सुरू केली आहे. शंकरनगर ते पुढे नायगाव लॉन्स या ठिकाणी पहिला टप्पा असणार आहे. चार वाजल्यानंतर दुसरं सत्र सुरु होणार आहे. सध्या राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चालतात. इतर नेतेही त्यांच्यासोबत चालत आहेत.
कन्याकुमारी येथून सुरु झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे. हजारो मशाल हाती घेऊन खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वतात निघालेली ही यात्रा सोमवारी रात्री महाराष्ट्रात नांदेडमधील देगलूर येथे दाखल झाली आहे. यावेळी त्यांच्या सोबत हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते होते, ज्यांच्या हातात मशाली होत्या. या यात्रेचं काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात जंगी स्वागत केले.
सकाळी 8.30 वाजल्यापासून राहुल गांधी यांची पदयात्रा गुरुद्वारापासून सुरू झाली. राज्यातल्या नांदेड,हिंगोली,वाशीम,अकोला आणि बुलढाणा अश्या ५ जिल्ह्यातून 14 दिवस हि यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. अकोला जिल्ह्यातील यात्रा मार्गांवर राहुल गांधी कारने प्रवास करणार आहेत.
या यात्रेत आघाडीतले शरद पवार आणि उध्दव ठाकरे हे दोन नेते सहभागी होणार की नाही याची चर्चा सूरू आहे. बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सध्या आजारी असलेले शरद पवार या यात्रेत सहभागी होणारं आहेत. शिवसेनेने मात्र ठाकरे पिता पुत्राच्या सहभागाबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे.
देगलूरहून ही यात्रा निघाल्यानंतर देगलूर ते नांदेड हा मार्ग 7 ते 12 नोव्हेंबर 5 दिवस हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. नांदेड मधील जवळपास 9 मार्गावरील वाहतूकही वळवण्यात आली आहे. यात्रा सुरळीत व्हावी यासाठी 300 अधिकारी, दीड हजार पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील रस्ते साफसफाई तसेच प्रमुख रस्त्यावरील दुभाजकांना रंगरंगोटीचे काम केले जात आहे. मागील आठ दिवसापासून दोन एकर खुल्या मैदानाची सफाई करण्यात आली आहे.
राहुल गांधींच्या सभेकडे उद्धव ठाकरेंची पाठ, उद्या शेगावला जाणार नाहीत
Bharat jodo Yatra : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची उद्या शेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेला शिवसनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार नाहीत. उद्धव ठाकरे त्यांच्या सभेला जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
राहुल गांधींच्या सभेकडे उद्धव ठाकरेंची पाठ, उद्या शेगावला जाणार नाहीत
Bharat jodo Yatra : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची उद्या शेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेला शिवसनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार नाहीत. उद्धव ठाकरे त्यांच्या सभेला जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
भारत जोडो यात्रा कोणीच थांबवू शकणार : यशोमती ठाकूर
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा ही कन्याकुमारीवरून सुरु झाली आहे. ही यात्रा श्रीनगरला जाऊन थांबणार आहे. या यात्रा आता कोणीच थांबवू शकणार नसल्याचे मत काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं.
आदिवासी बांधवांसोबत मेधा पाटकर भारत जोडो यात्रेत सहभागी
Bharat Jodo Yatra : जेष्ठ समाजसेविका मेधा पाटकर आज भारत जोडो यात्रेत नंदुरबार येथील आदिवासी बांधवांसोबत सहभागी झाल्या. काल राहुल गांधी यांच्यासोबत त्यांची एक तास वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली.
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधव पारंपारिक नृत्य सादर करत भारत जोडो यात्रेत सहभागी
Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांच्या भारत जोड यात्रेमध्ये आपल्याला वेगवेगळे पारंपारिक नृत्य व त्याचे वेगवेगळे रंग पाहायला मिळत आहेत. आज नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधव आपले पारंपारिक नृत्य सादर करत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.