एक्स्प्लोर
उद्धव ठाकरे म्हणजे नौटंकी, विखे-पाटलांची जहरी टीका
बुलडाणा : उद्धव ठाकरे यांची अवस्था ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील विनोदी कलाकारांपेक्षाही विनोदी झाली आहे. उद्धव ठाकरे म्हणजे नौटंकी, अशी जहरी टीका विधनसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ते बुलडण्यातील जाहीर सभेत बोलत होते.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या संघर्ष यात्रेला बुलडाणा जिल्ह्यातील राजमाता जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथून सुरवात झाली. या संघर्ष यात्रेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरुन सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
सिंदखेड राजा येथे जाहीर सभेला संबोधित करताना विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
“विमान कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या खासदाराच्या प्रश्नासाठी संसदेत शिवसेनेचे खासदार केंद्रीय मंत्र्यांसमोर धावून गेले, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार धावून गेलेलं कधी ऐकलं का?”, असा सवाल विखे-पाटील यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून विचारला.
“नुकतेच अभिनयाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. आता अभिनयाचे खरे पुरस्कार उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना द्यायला पाहिजे. एवढी फसवणूक त्यांनी महाराष्ट्राची केली आहे.”, अशीही टीका विखे-पाटलांनी केली.
शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत दिल्लीत एनडीएच्या स्नेहभोजनाला जाणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घ्यायला हवी होती, असेही विखे पाटील म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement