एक्स्प्लोर
Advertisement
गडकरींचा पुतळा हटवणारे सीसीटीव्हीत कैद
पुणे: पुण्याच्या संभाजी उद्यानातला राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवणारे तरुण सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेत. एबीपी माझाच्या हाती ही दृश्यं लागली आहेत.
काल मध्यरात्री 4 अज्ञात तरुण पुतळा हटवताना यात स्पष्टपणे दिसून येत आहेत. संभाजी ब्रिगेडनं या कृत्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
राम गडकरींचा पुतळा हटवला
नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुण्याच्या संभाजी उद्यानातील पुतळा हटवण्यात आला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा हटवला आहे. मात्र गडकरींचा पुतळा हटवण्यात संभाजी ब्रिगेडचा काहीही संबंध नसल्याचा दावा काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
‘राजसंन्यास’ या नाटकातून राम गणेश गडकरींनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. यातील मजकूर खटकल्याने संभाजी ब्रिगेडच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांनी रात्री अडीचच्या सुमारास पुतळा हटवला आणि शेजारुन वाहणाऱ्या मुठा नदीत पुतळा फेकून दिल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान चार कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहे आणि त्याआधारेच आता पोलिस तपास करत आहेत. पण पुतळ्याचा शोध अद्याप लागलेला नाही.
संबंधित बातम्या
राम गडकरींचा पुतळा हटवला, कोणाची काय प्रतिक्रिया?
नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा संभाजी ब्रिगेडने हटवला!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement