पावसाचा धुमाकूळ! पुन्हा अतिवृष्टीचा इशारा, अधिकारी तीन शिफ्टमध्ये काम करणार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांचे आदेश
पिंपरी चिंचवड शहर परिसरात तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरुय. शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांवरील धरणामधून करण्यात येणाऱ्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढली आहे.
पुणे पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad ) शहर परिसरात तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरु आहे. शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांवरील धरणामधून करण्यात येणाऱ्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून विशेष पावले उचलण्यात आली आहेत. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार, आपत्ती व्यवस्थापनासाठी तीन शिफ्टमध्ये आपत्कालीन कामकाज अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुढील काही तासात पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही तासात पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुणे जिल्ह्यासह घाट परिसरात अतिवृष्टी होत असल्याने व नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तातडीने निर्णय घेणे, आवश्यक साधनसामग्रीची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि बचावकार्याची प्रभावी अंमलबजावणी करणे अधिक सुलभ होणार आहे.
परिस्थितीनुसार आपत्ती निवारणाचे कार्य तातडीने व समन्वयाने पार पाडावे
नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाशी सातत्याने संपर्कात राहून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर राहावे, परिस्थितीनुसार आपत्ती निवारणाचे कार्य तातडीने व समन्वयाने पार पाडावे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. तसेच नागरिकांनी अतिवृष्टीदरम्यान धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
शिफ्टनिहाय नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी
सकाळची शिफ्ट (सकाळी 6 ते दुपारी 2)
समन्वय अधिकारी – संध्या वाघ, कार्यकारी अभियंता (संपर्क क्रमांक : 9922501758)
सहाय्यक अधिकारी – उप अभियंता विनायक माने, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत कुंभार, सहाय्यक स्थापत्य अभियंता प्रफुल्ल भोकरे, मुख्य लिपिक सुनील चव्हाण, लिपिक गोविंद गर्जे
दुपारची शिफ्ट (दुपारी 2 ते रात्री 10)
समन्वय अधिकारी – विजय भोजने, कार्यकारी अभियंता (संपर्क क्रमांक : 9922501768)
सहाय्यक अधिकारी – उप अभियंता सुनील दांगडे, कनिष्ठ अभियंता पंकज धेंडे, सहाय्यक स्थापत्य अभियंता चिन्मय कडू, मुख्य लिपिक मुरगू बोटे, लिपिक शिधाजी जाधव
रात्रीची शिफ्ट (रात्री 10 ते सकाळी 6)
समन्वय अधिकारी – सुनील पवार, कार्यकारी अभियंता (संपर्क क्रमांक : 9922501948)
सहाय्यक अधिकारी – उप अभियंता शाम गर्जे, कनिष्ठ अभियंता राजदीप तायडे, सहाय्यक स्थापत्य अभियंता शेषेराव अटकोरे, मुख्य लिपिक भरत कोकणे, लिपिक विनायक रायते
ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना देण्यात येत आहेत सूचना
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून नदीकाठच्या घाट परिसरात पाहणी करण्यात आली. तसेच ज्याभागात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होते, अशा परिसरात विशेष लक्ष ठेवले जात आहे. ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.
महत्वाच्या बातम्या:

























