एक्स्प्लोर

Pune Metro : पुणेकरांची मागणी अन् अजित पवारांचा आदेश; आता सकाळी सहा वाजेपासून धावणार पुणे मेट्रो, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर...

आता सकाळी सहा वाजेपासून पुणे मेट्रो धावणार आहे. मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची (Pune metro) बातमी आहे. पुणे मेट्रो आता सकाळी सहा वाजेपासून सुरु राहणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुणेकर असलेल्या मेट्रो प्रवाशांनी सकाळी सहा वाजेपासून मेट्रो सुरु करा अशी मागणी केली होती. त्यानुसार चांदणी चौकातील लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी अजित पवारांनी मेट्रो सहापासून सुरु करा, असं जाहीरपणे सांगितलं होतं. त्यानुसार मेट्रो प्रशासनाने आता सात नाही तर सकाळी सहा वाजेपासून मेट्रो सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. पुणे मेट्रो आता सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत सुरू राहणार आहे. पुणे मेट्रो आपली प्रवासी सेवा प्रवाशांच्या सोयीसाठी सकाळी 1 तास लवकर सुरू करीत आहे. वेळापत्रकाचा बदल हा वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या मार्गावर लागू करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानकाच्या वेळेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या मार्गावरील सेवा सकाळी 7 ते रात्री 10 अशीच सुरू असणार आहे. 

पुणे मेट्रोचं वेळापत्रक कसं असेल?

वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक मार्ग
सकाळी 6 ते 8 - दर 15 मिनिटांनी 
सकाळी 8 ते 11 - दर 10मिनिटांनी
सकाळी 11 ते दुपारी 4 - दर 15 मिनिटांनी
दुपारी 4 ते रात्री 8 - दर 10मिनिटांनी
रात्री 8 ते 10 - दर 15मिनिटांनी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक मार्ग

सकाळी 7 ते 8 - दर 15 मिनिटांनी 
सकाळी 8 ते 11- दर 10 मिनिटांनी
सकाळी 11 ते दुपारी 4 - दर 15 मिनिटांनी
दुपारी 4 ते रात्री 8 - दर 10 मिनिटांनी
रात्री 8 ते 10 - दर 15 मिनिटांनी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी काही दिवसांपूर्वी मेट्रोच्या दोन मार्गिकांचं लोकार्पण केलं. त्यानंतर पुणेकरांकडून या मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक पुणेकरांनी या मेर्टोत चक्क गर्दी केली होती. मेट्रोमुळे पुणेकरांचा प्रवास आता सोपा आणि वाहतूक कोंडी मुक्त होणार आहे. सकाळी सहावाजेपासून मेट्रो सुरु करा म्हणजे अनेकांना या मेट्रोचा फायदा होईल, असं पुणेकरांचं म्हणणं होतं. हा प्रतिसाह पाहून आता मेट्रो सहावाजेपासून सुरु करण्यात आली आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Metro : पक्के पुणेकर! शेवटी पुणेकरांनी मेट्रो हात दाखवून थांबवलीच; व्हिडीओ पाहून तुम्हीही ठेवाल डोक्यावर हात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचा फुल्ल टू ड्रामा, धनंजय देशमुख म्हणाले, धनंजय मुंडेंनी माझ्यावर दोन राऊंड केले फायर
बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचा फुल्ल टू ड्रामा, धनंजय देशमुख म्हणाले, धनंजय मुंडेंनी माझ्यावर दोन राऊंड केले फायर

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
Abdul Sattar: भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!
भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!
Shekhar Gore Satara : ​
​"साहेब, मी नक्की कुठे चुकलो?" विधानपरिषदेची उमेदवारी हुकल्याने शेखर गोरेंची देवेंद्र फडणवीसांना भावनिक साद
बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचा फुल्ल टू ड्रामा, धनंजय देशमुख म्हणाले, धनंजय मुंडेंनी माझ्यावर दोन राऊंड केले फायर
बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचा फुल्ल टू ड्रामा, धनंजय देशमुख म्हणाले, धनंजय मुंडेंनी माझ्यावर दोन राऊंड केले फायर
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईंड पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईंड पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
Vidhan Parishad Election 2026: काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवारांची संपूर्ण यादी, दिग्गजांसह तरुणांना संधी, नागपूरपासून लातूरपर्यंत शड्डू ठोकला
काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवारांची संपूर्ण यादी, दिग्गजांसह तरुणांना संधी, नागपूरपासून लातूरपर्यंत शड्डू ठोकला
Embed widget