एक्स्प्लोर
बहुप्रतीक्षित पुणे मेट्रोला अखेर पीआयबीची मंजुरी
नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित पुणे मेट्रोला अखेर पीआयबीची अर्थात सार्वजनिक गंतवणूक मंडळाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे पुणे मेट्रोच्या प्रस्तावाला आता केवळ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची औपचारिकता शिल्लक आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी मंजुरीही मिळण्याची शक्यता आहे
मागील काही वर्षांपासून भिजत पडलेलं पुणे मेट्रोचं घोंगडं आता मार्गी लागणार आहे. मेट्रो भुयारी की जमिनीवरील तसंच यामुळे होणारी पर्यावरण हानी अशा अनेक वादांमुळे पुण्याची मेट्रो रखडली आहे. त्यामुळे मेट्रोचा खर्चही कित्येक कोटींच्या घरात पोहोचला आहे.
मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीच्या मेट्रो मंजुरीनंतर महापालिका निवडणुकांचा नारळ फोडण्याची सुवर्णसंधी फडणवीस सरकारच्या हातात आहे.
कसा असेल पुणे मेट्रोचा मार्ग?
स्वारगेट-पिपंरी चिंचवड हा मेट्रोचा पहिला टप्पा असेल तर वनाज-रामवाडी मेट्रोचं काम दुसऱ्या टप्प्यात पूर्ण होईल. स्वारगेट-पिंपरी चिंचवड मेट्रोचा मार्ग 16. 59 किमी लांबीचा असेल तर वनाज-रामवाडी मेट्रोचा मार्ग 14.29 किमी लांबीच असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement