एक्स्प्लोर

पुण्यातील महिलेचा मृत्यू अपघाती नाही, सात महिन्यांनी बनाव उघड, भावानेच संपवलं

पुण्यातील हिंजवडी पोलिसांनी आरोपी जॉन डॅनिअल बोर्डे याला बेड्या ठोकल्या आहेत. 9 सप्टेंबर 2018 रोजी बहीण संगीता हिवाळेचा कार अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव त्याने रचला होता.

पुणे : पुण्यात गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेला महिलेच्या अपघाती मृत्यू प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे. विम्याचे तीस लाख रुपये मिळावेत, यासाठी संबंधित महिलेच्या भावानेच तिची निर्घृण हत्या केली आणि तिचा मृत्यू अपघाती असल्याचं भासवलं, असं पोलिस तपासात समोर आलं आहे. पुण्यातील हिंजवडी पोलिसांनी शनिवारी 40 वर्षीय आरोपी जॉन डॅनिअल बोर्डे याला बेड्या ठोकल्या आहेत. 9 सप्टेंबर 2018 रोजी 44 वर्षीय संगीता हिवाळे यांचा कार अपघातात मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. मात्र सात महिन्यांनी हा प्रकार आरोपीने रचलेला बनाव असल्याचं उघड झालं. काय होता दावा? आरोपी जॉन डॅनिअल बोर्डे बहीण मनिषा हिवाळे यांना कारने रुग्णालयात नेत होता. त्यावेळी कारमध्ये संगीता यांचा 15 वर्षीय मुलगा सायमन आणि आई मायाही होत्या. अर्ध्या वाटेत कारमध्ये बिघाड झाल्यामुळे आपण, सायमन आणि आई गाडीतून खाली उतरलो, असं जॉनने सांगितलं. तितक्यात कारने पेट घेतला. आपण बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही मिनिटातच गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने संगीता यांचा होरपळून मृत्यू झाला, असं जॉनने सांगितलं होतं. प्रत्यक्षात काय झालं? आरोपी जॉन आणि संगीता यांचं पैशावरुन भांडण झालं. रागाच्या भरात त्याने बहिणीचं डोकं जमिनीवर आपटलं. यावेळी घरात दोघांव्यतिरिक्त कोणीच नव्हतं. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने जॉनने तिला गाडीत बसवलं. संगीता यांचा मुलगा सायमन आणि आई माया यांनाही जॉनने सोबत घेतलं. VIDEO | खासदार उदयनराजेंनी नरेंद्र पाटलांचं चॅलेंज स्वीकारलं | सातारा कात्रज-देहू रोड बायपासवर गाडीत बिघाड झाल्याचं सांगत जॉन खाली उतरला. सायमन आणि आईलाही त्याने गाडीतून खाली उतरवलं. तर संगीता ग्लानीत असल्यामुळे गाडीतच बसून होत्या. काही वेळाने सायमन आणि आईचं लक्ष नसल्याचं पाहून जॉनने दहा लीटर केरोसिन संगीता यांच्या अंगावर आणि गाडीवर ओतलं, त्याचवेळी गाडी पेटवून दिली. सायमनने आईला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग पसरल्यामुळे त्याला यश आलं नाही. आरोपी जॉनही बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा बनाव करत होता. दरम्यान, सीएनजी कारला आग लागल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. तपासणीत पोलिसांना केरोसीनचे अवशेष आढळले आणि पोलिसांनी जॉनची कसून चौकशी केली. चौकशीत जॉनने हत्येची कबुली दिली. विम्याचे तीस लाख रुपये मिळावेत, यासाठी बहिणीची हत्या केल्याचं जॉनने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2026 | सोमवार
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर

Embed widget