Pune Gnapati News : गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांची आणि पुणे पोलिसांची उद्या पुन्हा बैठक
पुण्यात गणेशोत्सवाच्या दिव्य आणि राज्यात चर्चा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाच्या बैठकींनादेखील सुरुवात झाली आहे. मात्र पहिल्याच बैठकीत गणेश मंडळांकडून पुणे पोलिसांवर बहिष्कार घालण्यात आला आहे.

Pune Ganpati News : पुण्यात गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. याच (Ganpatiutsav 2023) भव्य दिव्य आणि राज्यात चर्चा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाच्या बैठकींनादेखील सुरुवात झाली आहे. याच तयारीसाठी आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत पुणे पोलिसांनी मानाचे आणि इतर गणेश मंडळात दुजाभाव केल्याचं समोर आलं आहे. मानाच्या गणपती मंडळांना आणि इतर महत्वाच्या गणपती मंडळाच्या वेगळ्या वेळा दिल्यामुळे इतर गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुणे पोलिसांच्या या कृतीच्या निषेध केला. त्याचप्रमाणे त्यांनी पुणे पोलिसांच्या बैठकीवर बहिष्कार घातला. दोन्ही गणपती मंडळात भेदभाव केल्याचा आरोप गणपती मंडळाने केला आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. पुणे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात तयारीदेखील करण्यात येते. याच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि गणेश मंडळांकडून बैठक आयोजित केली जाते. यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली होती. शहरातील मानाच्या आणि इतर महत्वाच्या मंडळांची बैठक आयोजित केली होती. सर्व मंडळांना 12 वाजताची वेळ देण्यात आली होती. मध्य भागातील महत्वाची 30 ते 40 मंडळे आयुक्तालयात वेळेत दाखल झाली. मात्र त्यापूर्वीच मानाच्या गणपती मंडळांची बैठक ही सकाळी 10 वाजता सुरु झाल्याचं लक्षात आलं. त्यामुळे अन्य गणपती मंडळांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. तुम्ही दुजाभाव करता आहात असे म्हणत त्यांनी पोलिसांच्या पहिल्याच बैठकीवर बहिष्कार टाकला. नाराज असलेल्या मंडळांनी पुणे पोलिसांसमोर नाराजी व्यक्त केली. त्यांनी थेट पोलिसांनी घेतलेल्या पहिल्य़ाच बैठकिवर बहिष्कार टाकला. पोलिसांच्या कृत्याचा निषेध करत सगळ्या गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी निघून जाण्याचा निर्णय घेतला.
उद्या बैठकीचं आयोजन
उद्या (10 ऑगस्ट) बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील प्रसिद्ध अशा दुर्वांकर हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. पुण्यात गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. या सोहळ्याची तयारी करण्यासाठी उद्या पुणे पोलिसांनी गणेश मंडळांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. परिमंडळ एकमधील डेक्कन, फरासखाना, खडक, समर्थ, शिवाजीनगर, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील गणेशमंडळांची ही बैठक होणार आहे. मंडळांना गणेशोत्सवाच्या काळात येणाऱ्या अडचणी, सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना आवश्यक परवानगी या मुद्द्यांवर या वेळी चर्चा होणार आहे. तसेच गणेशमंडळांनी गणेशोत्सव काळामध्ये घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. सुरक्षिततेच्या अनुषंगाने गणपती उत्सवाच्या ठिकाणची सुरक्षा,गणेशोत्सव काळात रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही यासाठीच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
