एक्स्प्लोर
पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत मायलेकीला बेदम मारहाण
पुणे : सोसायटीतील दोन महिन्यांची कुत्र्याची पिल्ले घेऊन जाण्यास विरोध केल्यामुळे 20 वर्षीय तरुणी आणि तिच्या आईला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
तक्रारदार तरुणी सेजल सराफ आणि आरोपी मिलिंद काळे कोथरुडच्या उच्चभ्रू महात्मा सोसायटीत राहतात. सेजल सराफ आणि तिच्या आईने रस्त्यावरील कुत्र्यांच्या 3 पिल्लांना घरात आश्रय दिला होता. मात्र शेजारी राहणाऱ्या मिलिंद काळेंना या कुत्र्यांच्या पिल्लांचा त्रास होत होता.
त्यामुळे कुत्र्यांची पिल्ले घेऊन जाण्यासाठी मिलिंद काळेंनी महापालिकेची श्वानपथकाची गाडी बोलावली होती. पण ही पिल्ले दोन महिन्यांची असल्याने सेजल आणि तिच्या आईने विरोध केला.
त्यामुळे चिडलेल्या मिलिंद काळेंनी सेजल आणि तिच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत सेजलचा दात पडला. यानंतर सेजलने कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये मिलिंद काळेंविरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन काळेला अटक केली आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement