एक्स्प्लोर
पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांचं निधन
पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं.
पुणे: पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना रविवारी खराडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मात्र त्यांना झोपेतच हृदयविकाराचा धक्का आल्याचं सांगण्यात येत आहे.
चंचला कोदे या 2013 मध्ये राष्ट्रवादीकडून महापौरपदी निवडून आल्या होत्या. त्यांनी महापौर निवडणुकीत शिवसेनेच्या सोनम झेंडे यांचा 41 मतांनी पराभव केला होता.
यंदा त्या प्रभाग क्रमांक 22 मधून दुसऱ्यांदा विजयी झाल्या होत्या.
पहिल्यांदा जेव्हा निवडून आल्या, तेव्हाच त्यांना राष्ट्रावादीने थेट महापौरपदी बसवलं होतं. हसतमुख आणि मितभाषी नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती होती.
https://twitter.com/PawarSpeaks/status/942700780787773440
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
Advertisement