एक्स्प्लोर
पुण्यातील बेकरीत आग, सहा कामगारांचा होरपळून मृत्यू
पुणे : पुण्यातील कोंढवा बुद्रुक इथल्या बेकरीत आग लागली. या आगीत बेकरीतील सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.
बेक्स अॅण्ड केक्स या बेकरीत आज पहाटे साडेचारच्या सुमारास आग लागली. बेकरीला बाहेरुन कुलुप असल्याने कामगार आतच अडकले. त्यामुळे आत झोपलेल्या सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.
इरशाद खान, जुनैद अन्सारी, शोनु अन्सारी, झाकीर अन्सारी, फहिम अन्सारी, जिशान अन्सारी अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व उत्तर प्रदेशचे रहिवासी होते.
दरम्यान, आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement