धक्कादायक! डोक्यावर आणि कंबरेवर फरशीने केले वार, येरवडा कारागृहात आरोपींमध्ये हाणामारी, एका आरोपीचा मृत्यू
पुण्यातील येरवडा कारागृहातच (Yerwada jail) हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हाणामारीत एका आरोपीचा मृत्यू झाला आहे.
Pune Crime news : पुण्यातील येरवडा कारागृहातच (Yerwada jail) हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हाणामारीत एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. 15 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात एका आरोपीला मारहाण झाली होती. बराक क्रमांक 1 मध्ये आरोपीला मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये विशाल कांबळे अस मृत पावलेल्या आरोपीचे नाव आहे.
विशाल कांबळे याच्या डोक्यावर व कंबरेवर फरशीने केले वार
विशाल कांबळे याच्या डोक्यावर व कंबरेवर फरशीने वार करण्यात आले होते. आकाश चंडालिया आणि दीपक रेड्डी असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. विशाल कांबळे याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. येरवडा कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
येरवडा कारागृहात नेमकं काय घडलं?
कारागृहातील कैद्यांनी विशालच्या डोके आणि कमरेवर फरशीने वार केले. कारागृहातील आकाश चंडालिया आणि दीपक रेड्डी याने विशालवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विशालला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात दाखल केलेल्या विशालचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी विशालच्या मृत्यूने येरवडा कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आरोपीच्या मृत्यूने कैद्यांमध्ये एकच खळबळ उडाली
दरम्यान, या घटनमेमुळं पुण्यातील येरवडा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. पुण्यातील येरवडा कारागृहातून सुटल्यानंतर गुन्हेगारांनी रॅली किंवा 'रोड शो' केल्याचे अनेकदा समोर आलं आहे. आता कारागृहातच हाणामारीत होऊन आरोपीचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. आरोपीच्या मृत्यूने कैद्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
येरवडा तुरुंग हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा तुरुंग
येरवडा मध्यवर्ती तुरुंग हा महाराष्ट्रातील पुणे शहरात असलेला महासुरक्षित तुरुंग आहे असं म्हटलं जातं. हा तुरुंग महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा तुरुंग आहे. तर दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या तुरुंगांपैकी एक आहे. यात अंदाजे 5 हजाराहून अधिक कैदी बंदिस्त राहू शकतात. या तुरुंगात अनेक व्यक्ती येथे बंदिवासात होत्या. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक स्वातंत्र्यसैनिकही ह्या तुरुंगात बंदिवासात होते. येरवडा मध्यवर्ती कारागृह ब्रिटिशांनी 1871 मध्ये बांधले. तेव्हा येरवडा पुणे गावाबाहेर होते. हे कारागृह 512 एकर जागेत पसरलेले आहे. इथे पाच हजाराहून जास्त कैदी राहू शकतात आणि दक्षिण आशियातील सर्वांत मोठ्या तुरुंगांपैकी एक आहे. या तुरुंगात अत्याधिक सुरक्षा असलेल्या कैद्यांसाठी अंडा सेलसुद्धा आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Crime News: भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
























