(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Sextortion case : पुण्यात 32 वर्षीय तरुण अडकला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात; तरुणाची 5 लाखांची फसवणूक- नेमकं काय घडलं...
पुण्यातून पुन्हा सेक्सटॉर्शनचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीकडून तरुणाची 5 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तरुणीकडून तरुणाची 5 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
Pune Sextortion case : पुण्यातून पुन्हा सेक्सटॉर्शनचा (sextortion) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीकडून तरुणाची 5 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. दोघांची ऑनलाईन अॅपवरुन ओळख झाली होती. याप्रकरणी 32 वर्षीय तरुणाने पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी नवी मुंबईतील कळंबोली येथील राहणाऱ्या प्रीती देशपांडे उर्फ प्रीती गहांदुळेच्या (30) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार जून 2021 पासून सुरू होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि प्रीती देशपांडे उर्फ प्रीती गहांदुळे यांची ओळख "स्टार मेकर" या मोबाईल ॲप वरुन झाली होती. प्रीतीने फिर्यादीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर तिने फिर्यादीशी शरारिक संबंध प्रस्थापित करून त्यांची फसवणूक केली. या पुढे जाऊन प्रीतीने या तरुणाला वेळोवेळी 5 लाख रुपयांची मागणी केली. तसेच त्या तरुणाला तुझ्या घरी आणि ऑफिसमध्ये हे सगळं प्रकरण सांगून बदनामी करेल, अशी धमकी देखील दिली. पैसे नाही दिले तर आत्महत्या करेल असे देखील वारंवार धमकावले. यानंतर फिर्यादीने या जाचाला कंटाळून पोलिसात धाव घेतली.
यापूर्वी दोन आत्महत्या
पुण्यात सेक्सटॉर्शनच्या प्रकरणात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील दोन तरुणांनी सेक्सटॉर्शनमुळे आत्महत्या केली होती. दोन्ही तरुणांची सोशल मीडियावरुन ओळख झाली होती. या दोघांनाही पैशाची मागणी करण्यात आली होती. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन दोघांनाही मानसिक त्रास दिला होता. या त्रासाला कंटाळून आत्महत्येचं पाऊन उचललं होतं. त्यानंतर पुण्यात खळबळ उडाली होती.
1400 पेक्षा जास्त तक्रारी
पुणे शहरात 2022 मध्ये सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकलेल्यांची संख्या तब्बल 1,400 हून अधिक आहे, अशी माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी सेक्सटॉर्शनमुळे पुण्यात दोघांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर सेक्सटॉर्शनबाबत चर्चा वाढू लागली. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1400 हून अधिक लोकांनी तक्रारी दिल्या आहेत. मात्र सेक्सटॉर्शनच्या सापळ्यात अडकलेल्यांची संख्या यापेक्षा जास्त असू शकते, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे.
तुम्हाला धमकी दिल्यास घाबरु नका-
-घाबरू नका, शांत रहा, चॅट थांबवा आणि लॉगऑफ करा किंवा चॅटरूमच्या बाहेर पडा.
-नाही म्हणण्यास घाबरू नका आरोपींनी सांगितलेल्या गोष्टी करण्याची आपली तयारी नसल्यास त्यांना न घाबरता तसे सांगा.
-आपणांस कोणी धमकावल्यास किंवा त्रास दिल्यास पालकांना लगेचच त्याबद्दल सांगा.
-आपल्या संवादाचा स्क्रीनशॉट घ्या आणि तो पुरावा म्हणून पोलिसांना दाखवला जाईल असे धमकवणाऱ्याला सांगा
-कोणी आपल्याशी असभ्य भाषेत संवाद केल्यास किंवा धमकावल्यास त्या संवादाचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, तो नंतर गरज पडल्यास पुरावा म्हणून वापरता येईल.
-लगेच लॉगऑफ करू नका, कोणी आपल्याशी असभ्य भाषेत संवाद केल्यास किंवा धमकावल्यास लगेचच लॉगऑफ करू नका, पालकांना, सायबर एक्स्पर्ट यांच्याशी चर्चा करा.