Pune Bridge: चांदणी चौकातील पाडलेल्या पुलाचा ढिगारा हटवण्याचं काम सुरु; वाहतूक अजूनही बंदच, पर्यायी वाहतूक अशी...
Pune Chandani Bridge Update: चांदणी चौकातली वाहतूक अजूनही बंदच आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. ढिगारा हटवण्याचं काम काही तास सुरुच राहणार आहे.
Pune Chandani Bridge Update: पुण्यातल्या वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरणारा चांदणी चौकातला पूल अखेर रात्री 1 वाजून 7 मिनिटांनी जमीनदोस्त झाला. स्फोटानंतर पुलाजवळ काही वेळ केवळ धुळीचे लोटच दिसत होते. हळूहळू धुळीचे लोट खाली बसले आणि चांदणी चौकातला पूल पडल्याचं चित्र समोर आलं. गेले अनेक दिवस पूल पाडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. पुलाला 1 हजार 300 छिद्र पाडून 600 किलो स्फोटकं भरण्यात आली होती. जय्यत तयारी करून आणि सर्व खबरदारी घेऊन रात्री एक वाजल्यानंतर पूल पाडण्याचं काऊंटडाऊन सुरु झालं. आणि पुणेकरांची कोंडी करणारा हा पूल क्षणभरात उद्ध्वस्त झाला. पूल पाडल्यानंतर ढिगारे हटवण्याचं काम सुरु झालं. काही तासांत हे ढिगारे हटवण्याचं काम पूर्ण होणार आहे.
पूल पाडल्यानंतर गेल्या सहा तासांहून अधिक काळ तिथला राडारोडा हटवण्याचं काम सुरू आहे. जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीनं दोन्ही बाजूंनी काम सुरु आहे. स्वतः जिल्हाधिकारी या कामावर लक्ष ठेवून आहेत. चांदणी चौकातली वाहतूक अजूनही बंदच आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. ढिगारा हटवण्याचं काम काही तास सुरुच राहणार आहे.
वाहतुकीतील बदल-
- मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडून येणारी जड वाहतूक ही ऊर्से टोलनाका येथेच थांबविण्यात येणार आहे.
- साताऱ्याकडून येणारी जड वाहतूक ही खेड शिवापूर टोलनाक्याजवळ थांबविण्यात येणार आहे.
- मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी ते ऊर्से टोलनाका या दरम्यान दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी करण्यात येणार आहे.
- मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील डुक्कर खिंड ते पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील घोडावत चौक या दरम्यान दोन्ही बाजून सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस बंदी राहिल.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग-
मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या हलक्या आणि प्रवासी चारचाकी वाहनांसाठी-
• मुंबईकडून येणारी हलकी व प्रवासी चारचाकी वाहने ऊर्से टोलनाका येथून जुन्या पुणे- मुंबई रस्त्याने भक्ती शक्ती चौक, नाशिक फाटा, बोपोडी चौक, इंजिनीअरींग कॉलेज चौक, संचेती चौक, खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पूल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करु शकता.
• वाकड चौक डावीकडे वळून राजीव गांधी पुलावरुन विद्यापीठ चौक, संचेती चौक, उजवीकडे वळून खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पुल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करु शकता.
• राधा चौक डावीकडे वळून बाणेर रोडने विद्यापीठ चौक, उजवीकडे वळून संचेती चौक, उजवीकडे वळून खंडोजीबाबा चौक, टिळक रोडने जेधे चौक, पुणे सातारा रोडने कात्रज चौक, सरळ जुना कात्रज बोगदामार्गे साताऱ्याकडे किंवा कात्रज चौक, नवले पूल डावीकडे वळून मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करु शकता.
साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या व प्रवासी चारचाकी वाहनांकरता-
- खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, पुणे सातारा रोडने जेधे चौक, डावीकडे वळून सारसबाग, पुरम चौक, डावीकडे वळून टिळक रोडने खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन रोडने वीर चाफेकर चौक, डावीकडे वळून विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाकडे जाता येणार आहे.
- खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, डावीकडे वळून नवले पूल, वडगांव पूल अंडरपास, सिंहगड रोडने राजाराम पूल, डी.पी. रोडमार्गे नळस्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाकडे जाता येणार आहे.
- खेड शिवापूर टोलनाका, शिंदेवाडी, जुना कात्रज बोगदा, कात्रज चौक, डावीकडे वळून नवले पूल, वडगांव पूल, वारजे पूल अंडरपास, आंबेडकर चौक, वनदेवी चौक, कर्वे पुतळा चौक, नळस्टॉप, लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, विद्यापीठ चौक, राजीव गांधी पुलावरुन औंध वाकड रोडने वाकड चौक, डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाकडे जाता येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या