एक्स्प्लोर

Pune Bypoll election : 'त्रास बापट साहेबांना होत होता... पण यातना आम्हाला जाणवत होत्या'; 'या' नेत्याने घेतला आज प्रचार न करण्याचा निर्णय

कसबा पोटनिवडणुकीत सध्या धुमधडाक्यात प्रचार सुरु आहे. मतदार संघात तंग वातावरण झालं आहे. याच प्राचारांच्या वाातवरणात मात्र हिंदू महासंघांचे उमेदवार आनंद दवे यांनी प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Pune Bypoll election :  कसबा पोटनिवडणुकीत  (Pune Bypoll Election)  सध्या धुमधडाक्यात प्रचार सुरु आहे. मतदार संघात तंग वातावरण झालं आहे. याच प्रचारांच्या वाातवरणात मात्र हिंदू महासंघांचे उमेदवार आनंद दवे यांनी प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या प्रचारासाठी आजारी असतानाही बापटांना (Girish bapat)  प्रचारासाठी मैदानात यावं लागलं. बापटांची ही अवस्था पाहून हिंदू महासंघाने प्रचार न करण्याचा निर्णय घेतल्याचं दवेंनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी मेसेज करत माध्यमांना ही माहिती दिली आहे.

मेसेज मध्ये काय लिहिलंय?

बापट पाहून पर्रीकर आठवले...आज मी व्यक्तिशः प्रचार करणार नाही त्रास बापट साहेबांना होत होता... पण यातना आम्हाला जाणवत होत्या. आमच्या भूमिकेमुळे हे घडत आहे याचा मानसिक त्रास आम्हाला होत असल्यामुळे मी आज व्यक्तिशः प्रचार करणार नसल्याचं ठरवलं आहे, असं त्यांनी माध्यमांना पाठवलेल्या मेसेजमध्ये लिहिलंय.

दवे म्हणाले की, भाजपचा हा सगळा प्रयत्न फक्त पोटनिवडणूक जिंकण्यासाठी सुरु आहे. यासाठी भाजप गिरीश बापट यांना मैदानात उतरवत असेल तर त्यासाठी हिंदू महासंघ कारणीभूत असल्यास त्याच्या यातना आम्हाला होत आहे. गिरीश बापट यांना पाहून काल मला दुःख झाले. त्या गोष्टीचा आत्मक्लेश म्हणून आजच्या दिवशी आम्ही प्रचार करणार नसल्याचे दवे यांनी जाहीर केले आहे. बापटांना आमच्यामुळे त्रास होत असल्यामुळे आज दिवसभर आम्ही प्रचार करत नसल्याचं त्यांनी जाहीर केल्याचं सांगितलं आहे. 

हिंदू महासंघामुळे भाजपची धाकधूक वाढली...

मागील चाळीस वर्ष गिरीश बापट यांचे कसब्यावर वर्चस्व आहे. त्यांनीच दिवंगत आमदार मुक्ता टिळकांना राजकारणात आणलं होतं. आज त्यांच्याच निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे त्यांनी कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी आजारी असतानाही प्रचारात उतरण्याचा निर्णय घेतला . कसबा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओखळला जातो. मात्र कसब्यात यंदा ब्राह्मणांना उमेदवारी न दिल्याने ब्राह्मण नाराज असल्याच्या चर्चा झाल्या. त्यात महाविकास आघाडी कसब्यातील बंडखोरी रोखण्यात यशस्वी झाले. ब्राह्मणांच्या नाराजीचा मुद्दा समोर ठेवत हिंदू महासंघाने उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढलं. भाजपचं टेन्शन हिंदू महासंघामुळे वाढलं त्यामुळे त्यांनी आजारी असलेल्या बापटांना मैदानात उतरवलं, अशा चर्चा सुरु आहे. हिंदू महासंघाच्या भूमिकेमुळे भाजपला एवढे प्रयत्न करावे लागतं आहे. बापटांना त्रास द्यावा लागत आहे याचं कारण देत एक दिवस प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र उद्यापासून ते प्रचार करणार आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget