Pune Accident: भीषण! पुण्यात रिव्हर्स घेताना चालकाची नजरचूक, 2 वर्षांच्या मुलाचा टँकरच्या चाकात येऊन जागीच मृत्यू
Pune Acident: वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपती माथा परिसरात काल रात्री (5 एप्रिल) ही घटना घडली . कर चालकावर वारजे पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. चालकाला अटक करण्यात आलीय .

Pune: पुण्यातील टँकर चालकाच्या बेफिकिरीमुळं दोन वर्षांच्या बाळाचा टँकरच्या चाकात येऊन मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलंय .टँकर रिव्हर्स घेताना चालकाचे लक्ष नसल्याने टँकरच्या मागच्या चाकाखाली येऊन दोन वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झालाय .या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे .वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपती माथा परिसरात काल रात्री (5 एप्रिल) ही घटना घडली .टँकर चालकावर वारजे पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय. चालकाला अटक करण्यात आलीय . (Pune Accident)
नक्की घडले काय ?
पुण्यात टँकरच्या चाकाखाली येऊन दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय .टँकर रिव्हर्स घेताना चालकाचे लक्ष नसल्याने ही घटना घडली .पुण्यातील वारजे परिसरातील गणपती माथा परिसरात शनिवारी रात्री हा प्रकार समोर आला .टँकर चालकाचे लक्ष नसल्याने गाडी रिव्हर्स घेताना दोन वर्षांचं मूल टँकरच्या मागच्या चाकाखाली आलं आणि अनर्थ झाला .यात दोन वर्षाच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला .सायंकाळी पावणेआठच्या सुमारास वारजे येथील एका सोसायटीत पाणी देऊन परत येत असताना ही घटना घडली .चाकाखाली बाळ आल्याचा कळताच परिसरात मोठी खळबळ उडाली होती .पोलिसांना घटनेची माहिती मिळताच वारजे पोलीस घटनास्थळी पोहोचले .याप्रकरणी वारजे पोलिसांनी टँकर चालकाला अटक करत त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय .चालकाची वैद्यकीय तपासणी ही करण्यात आली आहे . बाळाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे .या घटनेमुळे बाळाच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड आक्रोश होतोय .मध्यरात्रीच्या सुमारास चिमुकल्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले .चालकाने मागील नागरिकांच्या हातवारांकडे दुर्लक्ष करून तशीच गाडी रिव्हर्स घेतल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे .
सोलापूरात वडिलांना चिमुकलीसमोर आईला संपवलं
करमाळा तालुक्यातील कोर्टी येथे पत्नीचा गळा दाबून खून करून स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवराज लक्ष्मण शेरे (वय 31) व रूपाली युवराज शेरे (वय 25) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. गेल्या काही दिवसापासून युवराज सतत पत्नीला चिडचिड करत होता, कुटुंबियांना देखील तो मागील दोन महिन्यापासून व्यवस्थित बोलत नव्हता. त्याला कोणता तरी मोठा ताण होता, ज्याच्यातून टोकाचे पाऊल उचलत त्याने साडेचार महिन्याच्या चिमुकलीसमोरच पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वतःलाही संपविले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
हेही वाचा:

























