एक्स्प्लोर
पुण्यात दोन गटातील वादातून गोळीबार, रस्त्यावरुन जाणाऱ्याचा हकनाक बळी
तरुणांच्या दोन गटात भांडण सुरु होतं. यादरम्यान, एकाने दुसऱ्या टोळीच्या दिशेने बंदुकीतून गोळी झाडली. ही गोळी रस्त्यावरुन जाणाऱ्या स्वामी यांना लागली.

प्रातिनिधिक फोटो
पुणे : पुण्यातील हडपसरमध्ये दोन गटातील वादात निरपराध व्यक्तीचा हकनाक बळी गेल्याची घटना घडली आहे. दोन गटातील वादातून झालेल्या गोळीबारात रस्त्यावरुन जाणाऱ्या पंचय्या सिद्धय्या स्वामी या 55 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. फुरसुंगीमध्ये मंगळवारी (13 ऑगस्ट) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार तरुणांच्या दोन गटात भांडण सुरु होतं. यादरम्यान, एकाने दुसऱ्या टोळीच्या दिशेने बंदुकीतून गोळी झाडली. ही गोळी रस्त्यावरुन जाणाऱ्या स्वामी यांना लागली. त्यांना तातडीने नोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पंचय्या सिद्धय्या स्वामी हे एका बँकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. हडपसर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.
आणखी वाचा























