एक्स्प्लोर
कोथरुडमध्ये सातव्या मजल्यावरुन पडून चिमुकलीचा जागीच मृत्यू

पुणे : इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. पुण्याच्या कोथरुडमधील करिश्मा सोसायटीमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. निकिता अभिजीत पाटील असं मृत चिमुकलीचं नाही.
आज सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. चिमुकली झोपेतच असताना खिडकीजवळ गेली आणि खाली वाकल्याने तोल जाऊन ती खाली पडली.
महत्त्वाचं म्हणजे ही घटना घडली त्यावेळी ती घरात एकटीच झोपली होती. आई सकाळीच ऑफिसला गेली होती. तर वडील तिच्या मोठ्या बहिणीला शाळेत सोडण्यासाठी खाली गेले होते.
पण झोपेतून उठल्यानंतर घरात कोणीच नसल्याचं पाहून ती खिडकीजवळ गेली. खिडकीतून खाली वाकून पाहताना तिचा तोल गेला आणि जागीच मृत्यू झाला.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























