Maharashtra Weather मुंबई : मुंबई, ठाणे आणि आसपासच्या भागामध्ये सध्या प्रचंड उकडा (Temperature) वाढलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेतच. मात्र यात मनोरुग्णांचे देखील बेहाल झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य किमान आपल्याला होणारा त्रास किमान सांगू तरी शकतात. मात्र मनोरुग्णांचे (Psychiatric Patients) काय? देशात अनेक प्रकारचे मनोरुग्ण आहेत, त्यांना कशाप्रकारे त्रास होतोय आणि त्यांची लक्षणे नेमकी काय, सोबतच त्यावर उपचार नेमके काय आहेत? ही सविस्तर माहिती जाणून घेऊ.
उष्णतेच्या लाटेनं मनोरुग्णांचेही हालेहाल!
राज्यासह देशभरात पावसापूर्वीच्या अवकळी पावसामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात उकाडा वाढलेला आहे. याचे परिणाम सध्या राज्यभरात अनेक ठिकाणी पाहायला मिळतायत. मुंबई, ठाणे, पुणे या शहरात तर नागरिक उकाड्याने हैराण झालेत. अशातच सर्वसामान्य माणूस गर्मीमुळे काही ना काही तरी उपाय शोधत आपल्याला कंट्रोल करतो. मात्र कोणत्याही प्रकारच्या मानसिक आजाराने पिडीत अश्या मनोरुग्ण या परिस्थितीत हैराण झाल्याचे चित्र मनोरुग्ण रुग्णालयात आणि मानसोपचार तज्ञांच्या क्लिनिकमध्ये पाहायला मिळत आहेत. प्रचंड उकाडा आणि गर्मीमुळे मनोरुग्ण असह्य झाले आहेत. परिणामी, त्यांच्यात प्रचंड चिडचिड होत असल्याचे डॉक्टर सांगतात.
उष्माघातांच्या रुग्णांची संख्या एकीकडे राज्यसह देशभरात वाढत आहे. या उकाड्यात मानसिक आजारावर उपचार घेऊन गेलेल्या लोकांना पुन्हा काही ना काही त्रास जाणवतात. अलीकडे काही महिन्यात मनोरुग्णांची संख्या वाढली आहे. दर दिवसाला इतर महिन्या पेक्षा 50 ते 60 अधिक मनोरुग्णांची मुंबई, ठाण्यातील रुग्णालय व क्लिनिकमध्ये तपासणी वाढली आहे. अशी माहिती मानसोपचार तज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी दिली आहे.
मनोरुग्णांमध्ये उन्हाळ्यात दिसणारी लक्षणे
- मानसिक रुग्णांवर तणाव वाढतो
- झोप पूर्ण होत नाही
- लवकर राग येतो
- थकवा येतो
- मन विचलित होते
काय आहेत त्यांच्यातील लक्षणं ?
मनोरुग्णांना जी औषधं दिल्या जातात त्यामध्ये लिथियम सॉल्ट नावाचे तत्त्व असते. यामुळे त्यांच्या शरिरात मुबलक प्रमाणात पाणी असणे आवश्यक असतं. परंतु रुग्ण बरे झाल्यानंतर ते स्वत: किंवा त्यांचे कुटुंबीय याकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा रुग्ण औषधी वेळेवर घेत नाहीत. अशावेळी तापमान वाढल्याने ते तणावग्रस्त होतात. यामुळे त्याच्यात मनोरुग्णासारखी लक्षणे पुन्हा दिसू लागतात. त्यांना उष्माघाताचाही धोका असतो. शरिराचे तापमान वाढल्याने मनोरुग्णांचा स्वभावही बदलतो. ते सामान्य गोष्टीवरही वाद करु लागतात. सद्यःस्थितीत प्रादेशिक मनोरुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमध्ये अशा प्रकारचेही रुग्ण येऊ लागल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
काय उपचार कराव आणि काय करू नये
- उन्हात विनाकारण बाहेर फिरू नये.
- सतत पाणी पीत राहणं.
- नारळ पाणी अथवा इतर ज्यूस पिणं.
- या परिस्थितीत उपाशी राहू नये.
- उन्हात छत्रीचा, अथवा रुमालचा वापर करा.
- मानसोपचार तज्ञांनी दिलेल्या गोळ्या आणि औषध व्यवस्थित घ्याव्यात.
- डायबिटीज आणि ज्याला शुगर आहे त्यांनी व्यवस्थित सगळं चेकअप करणं गरजेचं.
- व्यवस्थित झोप घ्यायला हवी.
इतर महत्वाच्या बातम्या