पुणे : पुण्याचे जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे (Suhas Divse) वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं दिसत आहे. ते राजकीय प्रभावातून काम करत असून मतमोजणीआधी त्यांची बदली करावी अशी खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे केलीय. या तक्रारीत प्रांत अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत.यावर आता प्रतिक्रियादेखील उमटायला सुरुवात झाली आहे.अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहितेंनी या प्रकरणावर पलटवार केला आहे.
ते म्हणाले की, पुण्यातील खेड-राजगुरूनगरचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारेंनी कायतरी पाप केलंय, म्हणूनच मी आत्महत्या करेन, अशी धमकी त्यांना द्यावी लागत आहे. कट्यारेंनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर गंभीर आरोप केलेत. दिवसे आमदार दिलीप मोहितेंच्या आदेशाने कामं करतात, असं ही त्या तक्रारीत नमूद आहे. त्या तक्रारीला उत्तर देताना या प्रकरणाची सरकारने चौकशी करावी, अशी मागणी मोहितेंनी केली. येत्या अधिवेशनात मी प्रांताधिकारी कट्यारे आणि तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याबाबतचा हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचा इशारा ही मोहितेंनी दिला आहे.
कट्यारेंनी नेमके कोणते आरोप केले?
सुहास दिवसे हे खेड आळंदीचे आमदारांच्या प्रभावाखाली काम करत आहेत. सुहास दिवसे हे अनेक वर्षे कृषी आयुक्त, क्रिडा आयुक्त, पी एम आर डी ए चे संचालक अशा विविध पदांवर काम करत पुण्यातच ठाण मांडून आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या राजकीय हितसंबंचा आधार घेतला आहे.सुहास दिवसे यांनी माझ्या कार्यकाळात झालेल्या जमिन अधिग्रहण प्रकरणांची आधीच चौकशी सुरू केलेली असताना 28 मे रोजी त्यांनीं खेडच्या तहसील कार्यालयात पुन्हा छापा घातला. सुहास दिवसे यांनी हे सर्व खेड आळंदीच्या आमदारांच्या प्रभावातून केले आहे. सुहास दिवसे हे निवडणूकीच्या काळात सतत खेड आळंदीच्या आमदारांना भेटत होते, असे अनेक आरोप कट्यारेंनी केले आहे. त्यामुळे आता सुहास दिवसे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. हे आरोप खरे आहेत की नाही हे येत्या काळात नक्की स्पष्ट होईल.
इतर महत्वाची बातमी-