एक्स्प्लोर
गडकरींच्या वाड्यावर विदर्भवाद्यांचा मोर्चा, अणेंच्या गैरहजेरीची चर्चा

नागपूर : स्वतंत्र विदर्भाची मागणी करत नागपुरात भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरावर विराट मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनामध्ये वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्या हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे गडकरींच्या निवासस्थानी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे विदर्भवाद्यांनी केलेल्या या आंदोलनात कट्टर विदर्भवादी श्रीहरी अणे यांनी मात्र हजेरी लावली नाही. खासगी कामानिमित्त ते नागपूर बाहेर असल्याची कळतं. भाजप नेत्यांच्या घरासमोरील आंदोलनात श्रीहरी अणेंच्या अनुपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आणखी वाचा























