एक्स्प्लोर

नोटाबंदीच्या निर्णयात मोठी पळवाट ठेवली: पृथ्वीराज चव्हाण

मुंबई: 'नोटाबंदीमुळे काळ्या पैशाचे पांढरे करण्यास उलट मदतच झाली. जो पैसा बँकेत आला तो पांढरा झाला, मग काळा पैसा गेला कुठे? त्यामुळे नोटाबंदीचा जो काही उद्देश होता तो अजिबात सफल झालेला नाही. किंबहुना नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोठी पळवाट त्यामध्ये ठेवण्यात आली. प्रत्येकाला अडीच लाख जमा करण्याची मुभा दिली हिच मोठी त्या निर्णयामागील पळवाट होती.' अशी थेट टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. एबीपी माझाच्या नोटबंदीचे ५० दिवस या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. नोटाबंदीच्या निर्णयात मोठी पळवाट 'ज्या उद्देशाने नोटाबंदी केली, तो उद्देश अजिबात सफल झाला नाही. भारतात 98% रोखीने व्यवहार चालतात. त्यामुळे पूर्वतयारी नसतानाही नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला काँग्रेसनं कधीही विरोध केला नाही. निर्णय योग्य आहे पण त्याची अंमलबजावणी चुकीची होती. काळा पैसा हातात आला कुठे? नोटाबंदीच्या निर्णयात मोठी पळवाट ठेवली. नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर प्रत्येकी अडीच लाख जमा करण्याची मुभा का देण्यात आली? त्यामुळे ज्यांच्याकडे काळा पैसा होता त्यांनी आपल्या जवळच्या लोकांमध्ये ती रक्कम वाटून बँकेत पैसे जमा केले. आणि हिच मोठी पळवाट या निर्णयामध्ये होती.' असा आरोप चव्हाणांनी केला. नोटाबंदीचा नागरिकांना प्रचंड त्रास '500 रुपयाच्या नोटा मोठ्या प्रमाणात छापायला हव्या होत्या. पण हे सरकार ते करण्यात कमी पडलं. नोटा तयार ठेवायला पाहिजे होत्या. पण ते काहीही त्यांना जमलं नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास झाला. अजूनही लोकांना खरी परिस्थिती माहित नाही. पण किती मोठी लोकं रांगेत उभे राहिलेलं पाहायला मिळाले. असं काहीही झालं नाही. मोठ्या लोकांनी तेच पैसे सोन्यात गुंतवले. इतर ठिकाणी गुतवंले. त्यामुळे आता जो पैसा बँकेत जमा झाला तो सगळा पांढरा पैसा आहे. त्यामुळे सरकारच्या हातात काहीच आलं नाही.' असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. कॅशलेससाठी नोटाबंदीची गरज होती का? 'कॅशलेससाठी तुमच्याकडे पुरेशी तयारी नाही. ग्रामीण भागात कनेक्टिव्हीटी नाही. कॅशलेस करण्यासाठी नोटाबंदीची गरज होती का? नोटाबंदी हा निर्णय फक्त काळा पैसा काढण्यासाठी घेण्यात आलेला निर्णय. पण त्या निर्णयाचा फार काही फायदा सरकारला झाला नाही. तसंच कॅशलेस झाल्यावर भ्रष्टाचार कमी होतो हा गैरसमज देखील करुन घेऊ नका.' असंही चव्हाण म्हणाले. नोटाबंदीचा निर्णय चुकीचाच 'नोटाबंदी करणं हे योग्य नव्हतं हे खुद्द रघुराम राजन यांनीही म्हटलं आहे. आणीबाणी निर्णयाबाबतीच इंदिरा गांधींनी मोठेपणानं माफी मागितली होती. या सरकारचा नोटाबंदीचा निर्णय चुकीचा होता हे मान्य करायला हवं. पण आता या सर्वात मार्ग काढणं गरजेचं आहे. मी मार्ग सुचवला होता. २००ची नोट काढा, २०००ची नोट बंद करावी हे आधीच सांगितलं आहे.' असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. VIDEO:

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget