एक्स्प्लोर

'अब्दुल सत्तारांनाच आता शिक्षणमंत्री करतील'; पृथ्वीराज चव्हाणांची खोचक टीका 

Prithviraj Chavan on Maharashtra TET Scam : अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आता या आरोपानंतर सत्तारांवर काँग्रेसकडून टोलेबाजी सुरु झाली आहे. 

Prithviraj Chavan on Maharashtra TET Scam : सध्या राज्यभर गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात (TET Scam) माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटातील एक मोठे नेते म्हणजेच अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या एका मुलाचं आणि मुलीचं नाव समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. अब्दुल सत्तार यांच्या चार मुलांचं टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे. यावरुन आता अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आता या आरोपानंतर सत्तारांवर काँग्रेसकडून टोलेबाजी सुरु झाली आहे. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी सत्तारांवर खोचक टीका केली आहे. कोल्हापुरात बोलताना त्यांना टीईटी घोटाळ्याबद्दल विचारलं. यावेळी टीईटी घोटाळा प्रकरणी मुलांची नावं समोर आल्यानबाबत बोलताना चव्हाण यांनी म्हटलं आहे की, अब्दुल सत्तारांनाच आता हे शिक्षणमंत्री करतील. चव्हाण यावेळी म्हणाले की, घड्याळाचे काटे उलटे फिरवावे लागले तर फिरवावे लागतील. पण राज्यातील लोकशाही वाचावीच लागेल, असंही ते म्हणाले. 

अनेक अविचारी निर्णय केंद्र सरकार कडून घेतले जातं आहेत

चव्हाण कोल्हापुरात बोलताना म्हणाले की, मोदी सरकारने आतापर्यंत भरमसाठ कर्ज काढलंय. आता नवीन कर्ज मिळेल असं वाटत नाही. देशात  कर वाढवले आहेत. पंडित नेहरूंच्या दूरदृष्टीतून उभा राहिलेल्या संस्था विकल्या जात आहे. नोट बंदी सुद्धा फसली आहे.  अनेक अविचारी  निर्णय केंद्र सरकार कडून घेतले जातं आहेत. नड्डा यांनी संकेत दिले आहेत कि त्यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेला संपवून टाकायचं आहे. या आधी काँग्रेस मुक्त भारत घोषणा केली. चुकून दुसरं सरकार आलं तर ऑपरेशन लोटस वापरायचं अशी भाजपची खेळी आहे, असं देखील चव्हाण यावेळी म्हणाले.  

देशाची लोकशाही धोक्यात आली आहे

अडाणींची संपत्ती किती वाढली  हे जगातील आठवं आश्चर्य आहे.  केंद्र सरकारने आतापर्यंत भरमसाठ कर्ज काढलं आहे.  पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणं हा सोप्पा पर्याय असतो.  नागरिक काही झालं तरी इंधन भरत असतात.  देशात आर्थिक संकट आले आहे, देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. अर्थव्यवस्थेबाबत कोरोनाचे कारण दिले जाते मात्र ते खरे नाही.  कोरोनाच्या आधीपासून अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे.  मोदी सरकारकडून एकामागून एक चुका होत गेल्या त्याचा परिणाम झाला आहे. 4.9 हा सगळ्यात निच्चांकी विकास दर आहे, हा आकडा देखील खरा आहे की खोटा हा प्रश्न आहे, असंही ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget