संघर्ष माझ्या पाचवीलाच, मंत्रीमंडळात संधी मिळाली असती तर सोनं केलं असतं, प्रकाश सुर्वेंना अश्रू अनावर
मंत्रीमंडळात अनेक इच्छुकांना संधी मिळाली नाही. यातीलच एक नाव म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे. मंत्रीमंडळात संधी न मिळाल्यामुळं प्रकाश सुर्वेंनी (Prakash Surve) नाराजी व्यक्त केलीय.
Prakash Surve on Cabinet expansion : आज नागपूरमध्ये फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. यावेळी एकूण 39 जणांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. यामध्ये भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, यामध्ये अनेक इच्छुकांना संधी मिळाली नाही. यातीलच एक नाव म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे. मंत्रीमंडळात संधी न मिळाल्यामुळं प्रकाश सुर्वेंनी (Prakash Surve) नाराजी व्यक्त केलीय. संघर्ष माझ्या पाचवीलाच पुजलाय. संधी दिली असती तर सोनं करुन दाखवलं असतं, हे सांगताना प्रकाश सुर्वेंना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
आजपर्यंत जे मी मिळवलं आहे ते प्रचंड संघर्ष करुन मिळवल्याचे प्रकाश सुर्वे म्हणाले. ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं. त्यावेळी मुंबईतून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणारा पहिला मी आदार होतो असेही प्रकाश सुर्वे यावेळी म्हणाले.
नेमकं काय म्हणाले प्रकाश सुर्वे?
आता सरकार स्थापन झालं आहे. हे सरकारनं आता जोरानं काम करेल असे सुर्वे म्हणाले. मी एक सामान्य घरातील मुलगा आहे. संघर्ष करत इथपर्यंत आला आहे. जे मिळवलं ते संघर्ष करुन मिळवल्याचे आमदार प्रकाश सुर्वे म्हणाले. माझे वडील मिलमध्ये कामगार होते. मिल बंद पडली म्हणून आम्ही लालबागवरुन बोरवलीली शिफ्ट झालो. उदरनिर्वाहासाठी आईने आणि मी भाजीचा धंदा सुरु केला होता. भाजीचा धंदा कर शिक्षण पूर्ण केल्याचे प्रकाश सुर्वे म्हणाले. त्यामुळं संघऱ्ष माझ्या पाचवीला पुजला असल्याचे सुर्वे म्हणाले.
मंत्रीपद मिळवण्यात काही मोठ्या घरची मुलं, मी साध्या गरीब घरातील मुलगा
एकनाथ शिंदे यांनी माझा विचार केला देखील असेल पण मंत्रीपदे मागणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यामध्ये आजी माजी आहेत. काही मात्तबारांची मुलं होती. काही मोठ्या घरची मुलं आहेत. मी साध्या गरीब घरातील मुलगा असल्याचे प्रकाश सुर्वे म्हणाले. माझ्या जीवनात संघर्षच असल्याचे सुर्वे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी विचार करुनच घेतला असले असे सुर्वे म्हणाले. मला संधी मिळाली असती तर मी संधीचं सोनं केलं असतं असेही सुर्वे म्हणाले.
न्याय द्यायचा की नाही हे एकनाथ शिंदे साहेबांनी ठरवायचंय
शिंदे साहेब ठरवतील तो निर्णय आम्ही घेऊ असे प्रकाश सुर्वे म्हणाले. आम्ही सर्व शिंदे साहेबांसोबत आहोत. न्याय द्यायचा की नाही हे एकनाथ शिंदे साहेबांनी ठरवायचं आहे असेही प्रकाश सुर्वे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: