एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अस वाटतंय, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना खिशात घातलं आहे, ही त्यांची किमया असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
Prakash Ambedkar : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुन्हा स्वतःची पॉवर काय आहे हे दाखवून दिलं आहे. राज्यात आगामी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत आम्ही वेगळे लढणार असल्याचं भाजप सांगत होतं. मात्र, आता त्यांना माघार घ्यावी लागणार आहे. कारण युती करुन लढू अस सांगण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शाह (Amit Shah) यांना भेटले आहेत. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना खिशात घातलं आहे, ही त्यांची किमया असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. सर्व पालिकेत शिंदे आणि भाजप युती मध्ये लढणार आहे.
एकनाथ शिंदे येत्या महिना दोन महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटतंय
विधानसभा झाली आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं नाही त्याचा बदला असावा. त्यावरून असं दिसत आहे की एकनाथ शिंदे येत्या महिना दोन महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होतात का? असं वाटत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. शरद पवार चाणक्य आहेत. काही काळापूर्वी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी योग्य संदेश दिला होता. मला हे आणि असच दिसत आहे. अमित शाह सारख्याला ते खिशात घालतात असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील युती करु
महापालिका निवडणुकीच्या मुद्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, खेळ आता सुरु झाला आहे. NDA मध्ये अजून काही होणार का? हे पाहू आणि मग कुठं जायचं ते ठरवू असेही आंबेडकर म्हणाले. पण युती करुनच महापालिका निवडणुका आम्ही लढणार आहोत, असेही आंबेडकर म्हणाले. नगरपालिका निवडणुकीत आम्ही युती करुन लढलो. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील युती करु असेही ते म्हणाले.
कापूस आणि ऊस पीक तिकडे आहेत पण योग्य दर दिल जात नाही
संख्या नाही म्हणून विरोधी पद दिले गेले नाही. सिंगल लार्जेस्ट पार्टीचा अध्यक्ष द्यायला हवा होता. सगळ्यांनी बसून एक नाव सुचवायला हवं होतं पण तसं झालं नाही. दुर्दैवाने त्यांना म्हणजे भाजपला असं करायचं न्हवतं. वेगळ्या विदर्भाची मागणी जोर धरायला लागेल अस वाटत आहे. कापूस आणि ऊस पीक तिकडे आहेत पण योग्य दर दिल जात नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. फॉरेन एक्सचेंजच सगळा मुद्दा आहे या पिकातून ते जास्त मिळू शकते. फडणवीस विदर्भाचे आहेत त्यांच्याकडे कारभार आहे तरी दुर्लक्ष केलं जात आहे. विदर्भातल्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे असे आंबेडकर म्हणाले.
अनेक नियम घातले जात आहेत.























