एक्स्प्लोर

... तेव्हा शरद पवारच पंतप्रधानपदाचे उमेदवार पण 'दरबार राजकारणात' संधी हुकली : प्रफुल पटेल

शरद पवारांनी काँग्रेसला दिलेली ताकत पाहता तेच पंतप्रधानपदाचे उमेदवार होते पण दिल्लीच्या 'दरबार राजकारणात' ही संधी हुकली, असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी म्हटलंय. 1996 साली शरद पवार पंतप्रधान असणारं काँग्रेस सरकार बनलं असतं पण नरसिंह रावांमुळं देवेगौडा सरकार आलं, असंही प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे.

मुंबई : शरद पवारांनी काँग्रेसला ताकत दिलेली ताकत पाहता तेच पंतप्रधानपदाचे उमेदवार होते पण दिल्लीच्या 'दरबार राजकारणात' ही संधी हुकली. ज्यामुळं त्यांच्यासह काँग्रेस आणि देशाचे मोठे नुकसान झालं, असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. 1996 साली शरद पवार पंतप्रधान असणारं काँग्रेस सरकार बनलं असतं पण नरसिंह रावांमुळं देवेगौडा सरकार आलं, असंही प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज इंग्रजी दैनिक हितवादसह अनेक वर्तमानपत्रात पवारांवर लिहिलेल्या लेखात शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाविषयी महत्वाचे भाष्य केलं आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी लेखात म्हटलं आहे की, काँग्रेसची काम करण्याची पद्धत 'सुनियोजित बंड' घडवून आणणे, आपल्या पक्षात स्वतःच क्षेत्रीय नेतृत्वाला कमजोर करण्याचा प्रयत्न करणे अशी आहे. जे पवारांसोबतही केले गेले. पहिला फटका पवारांना 1989 ला आर के धवन, माखनलाल फोतेदार यांनी मोठे षडयंत्र करून देण्याचा प्रयत्न केला जो पवारांनी फोल पाडला, असंही पटेलांनी म्हटलंय.

ते लेखात म्हणतात, राजीव गांधींच्या हत्येनंतर फक्त पवारांना दूर ठेवणे या एका अजेंड्यासाठीच नरसिंह राव यांना आणले. देशभर काँग्रेसला पवार हवे होते. 1996 मध्ये पवार पंतप्रधान असणारी काँग्रेस सरकार बनू शकत असतानाही फक्त नरसिंह रावांमुळे देवेगौडा सरकार बनली. माझ्या घरातून ह्या घडामोडी होत होत्या, मी अधिकाराने हे सांगू शकतो, असा दावा देखील प्रफुल पटेलांनी केला आहे.

Sharad Pawar Birthday : शरद पवारांच्या वाढदिवशी पंतप्रधान मोदींसह दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव, अजित दादा म्हणतात...

त्यांनी म्हटलंय की, केसरीच्या वेळी जेव्हा गुजराल पंतप्रधान झाले. तेव्हा आम्ही आमच्या नजरेसमोर पवारांनी आपल्या स्वताच्या महत्वाकांक्षांचा गळा पक्षासाठी दाबला. सॉफ्ट स्टँड घेतला आणि अगदी सोपे असलेले पंतप्रधान पद सोडले हे आम्ही बघितले आहे. 13 दिवसात पडलेले वाजपेयी सरकार फक्त पवारांमुळे पडले. पण तरीही त्यांना मिळायला हवे होते ते स्वातंत्र्य काँग्रेसने त्यांना दिले नाही, असं पटेल यांनी म्हटलं आहे. त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने काँग्रेस ने अपमान केला. पार्लियामेंटरी पार्टीचे मुख्य बनवून त्यांनाच अंधारात ठेवले जायचे. महाराष्ट्रात आणि केंद्र स्तरावर त्यांच्या नेतृत्वाचा अपमान करणाऱ्या सतत गोष्टी घडवल्या जायच्या, असे आरोप देखील प्रफुल पटेल यांनी केले आहेत.

तर ते स्वप्न पूर्ण होणार - प्रफुल पटेल प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे की, आज 80व्या वर्षात पवार साहेबांना ज्या पदावर पाहायचं आहे ते अजून पाहिलेलं नाही. जर महाराष्ट्रानं ठरवलं साथ दिली तर हे शक्य होऊ शकतं जर ममतांचे 36 खासदार निवडून येऊ शकतात जगनमोहन यांचे 28 खासदार निवडून येऊ शकतात तर महाराष्ट्रांचे 48 खासदार पवारांच्या मागे का उभे राहू शकत नाही? जेव्हा आपण पवार साहेबांचा 85 वा वाढदिवस साजरा करू त्यावेळी आपलं स्वप्न साकार झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्ही आणि या सबंध महाराष्ट्रात पवार साहेबांवर प्रेम केलं आहे पण पवार साहेबांच्या मागे राहिलेलं नेतृत्व करू शकतात ती मला खात्री आहे, असं त्यांनी म्हटलंय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 07 AM : 05 जुलै 2024: ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6.00 AM : 05 JULY  2024Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Embed widget