मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांनी मांडलेली भूमिका अजिबात शक्य नाही, प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य
मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सर्वपक्षीय नेत्यांची भूमिका आहे. मात्र, त्यांना आरक्षण देताना ओबीसींचा अधिकार आणि टक्केवारी कमी होता कामा नये असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलं
Praful Patel : मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सर्वपक्षीय नेत्यांची भूमिका आहे. मात्र, त्यांना आरक्षण देताना ओबीसींचा अधिकार आणि टक्केवारी कमी होता कामा नये असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी केलं आहे. मराठा समाजाला देण्यात येणारं आरक्षण हे सुप्रीम कोर्टात टिकलं पाहिजे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही सर्वांनी दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही. आता शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी मराठा आरक्षणासंदर्भात मांडलेली भूमिका ही, एवढी सोपी नसून तुर्तकाळात तर ती अजिबात शक्य नसल्याची भूमिका प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त करत शरद पवारांनी व्यक्त केलेल्या भूमिकेला विरोध दर्शविला.
पूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या पक्षातील नेत्यांची इच्छा आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. पण, मराठ्यांना आरक्षण देत असताना ओबीसींचा जो अधिकार आहे, त्यांची जी टक्केवारी आहे, ती कमी होता कामा नये. ही सगळ्यांची भूमिका पूर्वीपासून आहे. शरद पवार साहेब पण तेच म्हणत होते की, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. सुप्रीम कोर्टानं 50 टक्क्यांची मर्यादा ठेवलेली आहे. केंद्र सरकारनं इडब्लूएस 10 टक्के दिल्यानं आता 60 टक्के आरक्षण झालेलं आहे. सुप्रीम कोर्टाचा निकष असा आहे की, जातीय आधारावर आरक्षण 50 टक्के0च्य वर देता येत नाही. आता पवार साहेब जे म्हणत आहे तो फार वेगळा विषय आहे. त्यावर मला फारसं बोलायचं नाही. फक्त एवढंचं म्हणेल की, त्यांना पण माहित आहे की, ते (शरद पवार) जे काही बोलून राहिले ते एवढं सोपं नाही ना हे शक्य. तुर्तास तर ते अजिबात शक्य नसल्याचे पटेल म्हणाले.
मराठा आरक्षणासंदर्भात आज मनोज जरांगे पाटील जे काही बोलत आहे सरसकट कुणबीचे दाखले द्या, ते तपासावं तर लागेल. आज आपण काहीजरी निर्णय घेतला तर उद्या याबाबत कोणीतरी कोर्टात जाणार आहे. कोर्टात निर्णय टिकला पाहिजे असे पटेल म्हणाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शरद पवार साहेब राष्ट्रवादीचे नेते म्हणून आम्ही सगळेच त्यांच्या सोबत होतो. तो सुप्रीम कोर्टात हा मुद्दा टिकू शकला नाही. लीगल तांत्रिक जी अडचण आहे, सगळ्या बाजूनं पाहूनचं त्याचा लीगल निर्णय घेता येईल. पण, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे त्याबद्दल कुणाच्याही मनात दुमत नाही असे पटेल म्हणाले.
आज लोकशाही मार्गानं जरांगे पाटील तिथे उपोषणाला बसलेले आहेत. सर्वांना अधिकार आहे. आमच्याही पक्षातील अनेक आमदार, नेते त्यांच्या भेटीला तिथे गेलेत. इतर पक्षासोबत भाजपचेही गेलेत. कुणाला भेटायला जाणे त्यात काहीही हरकत नाही. तिथं (सुप्रिया सुळेंबाबत झालेल्या प्रकारावर) जे काही घडलं असेल त्याबद्दल मी काहीही भाष्य करू इच्छित नाही असे पटेल म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
























