एक्स्प्लोर

मेगाभरती निवडणुकांच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता

सरकारच्या मेगा भरतीत कनिष्ठ अभियंता, कंत्राटी ग्रामसेवक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियंता, पशुधन पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक, विस्तार अधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी आदी विविध पदांसाठी ही भरती होणार आहे.

मुंबई : सरकारने मार्च महिन्यात मेगाभरतीची घोषणा करत बेरोजगार तरुणांना दिलासा मिळाला होता. मात्र चार महिन्यांपासून घोषणा होऊनही भरती प्रक्रिया पुढे सरकलेली नाही. लोकसभा निवडणुकीनंतर आता जालना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 26 ऑगस्टपर्यंत निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी आचारसंहिता 19 जुलैला लागू झाली आहे. ही आचारसंहिता संपल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील. त्यामुळे मेगाभरती निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची दाट शक्यता आहे. मेगा भरतीच्या अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी 16 एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली होती. शुल्क भरण्यासाठी अडचणी आल्या. आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेच्या काळातही हजारो बेरोजगार तरुणांनी ऑनलाइन अर्ज भरले. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा होती. मात्र, शासनाकडून कोणतेही निर्देश किंवा सूचना जिल्हा प्रशासनाला आल्या नाहीत. जिल्हा प्रशासनानेही कोणतेही मार्गदर्शन मागवले नाही. त्यातच औरंगाबाद जालना विधान परिषदेची निवडणूक आचारसंहिता 19 जुलैला लागू झाली. फडणवीस सरकारच्या मेगा भरतीत कनिष्ठ अभियंता, कंत्राटी ग्रामसेवक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियंता, पशुधन पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक, विस्तार अधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी आदी विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. पण ही भरती कधी होणार हा प्रश्न आहे. औरंगाबाद जालना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 26 ऑगस्टपर्यंत निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होईल. त्यासाठी सप्टेंबर महिन्यात विधानसभेची आचारसंहिता लागेल. त्यामुळे मेगा भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगार तरुणांना आणखी तीन-चार महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. सरकारच्या मेगाभरतीला आचारसंहितेचा फटका शासनाने आपल्या कार्यकाळातील बेरोजगारीचा कलंक पुसण्यासाठी मेगाभरतीची दारे खुली केल्याने बेरोजगार तरुणांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला होता. मात्र गेल्या चार महिन्यांपासून या भरती प्रक्रियेची गाडी काही पुढे सरकलेली नाही. लोकसभा निवडणुकीनंतर आता ही मेघा भरती विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली आहे. जिल्हा परिषदेने 2 मार्च रोजी 362 विविध संवर्गातील पदे भरण्यासाठी मोठी  जाहिरात प्रसिद्ध केली होती. शासनाच्या मेगाभरतीचा गाजावाजा पाहता ही प्रक्रिया सुरळीत पार पडेल असे वाटले होते मात्र या भरतीचे घोडे कुठे पेंड खाऊ लागलय असा अनेकांना प्रश्न पडला आहे. 2 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या जागांसाठी निघालेल्या जाहिरातीत कनिष्ठ अभियंता, कंत्राटी ग्रामसेवक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियंता (सहायक), पशुधन पर्यवेक्षक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, वरिष्ठ सहायक (लेखा), कनिष्ठ सहायक (लिपिक), विस्तार अधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी आदी विविध पदांसाठी ही भरती होणार आहे. सुरुवातीला 16 एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. शुल्क भरण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या अडचणी आल्याने या साठी आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. म्हणजेच ती 23 एप्रिल करण्यात आली. आचारसंहितेचा ब्रेक? 11 एप्रिल ते 19 मे 2019 दरम्यान जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्या अगोदर राज्यातल्या हजारो बेरोजगार तरुणांनी ऑनलाइन अर्ज भरले. लोकसभा निवडणूक संपल्यानंतर भरती प्रक्रिया सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, शासनाकडून कोणतेही निर्देश किंवा त्या संबंधीच्या सूचना जिल्हा प्रशासनाला आल्या नाहीत. प्रशासनानेही याबाबत कोणतेही मार्गदर्शन मागवले नाही. त्यातच  आता 19 जुलै रोजी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. 26 ऑगस्टपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. यानंतर ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होईल. सप्टेंबर महिन्यात विधानसभेची आचारसंहिता लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मेगाभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगार तरुणांना आणखी तीन-चार महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेची जिल्हा निहाय पदसंख्या 1)अहमदनगर- 729 2)नांदेड-  557 3)अकोला - 242 4)नंदुरबार- 332 5)अमरावती - 463 6)नाशिक -687 7)औरंगाबाद -362 8)उस्मानाबाद -320 9)बीड -456 10पालघर -708 11)भंडारा-143 12)परभणी -259 13बुलढाणा -332 14)पुणे-595 15)चंद्रपूर -323 16)रायगड-510 17)धुळे- 219 18)रत्नागिरी -466 19)गडचिरोली -335 20)सांगली -471 21)गोंदिया- 257 22)सातारा-708 23)हिंगोली-150 24)सिंधुदुर्ग-171 25)जालना -328 26)सोलापूर 415 27)जळगाव-607 28)ठाणे 196 29कोल्हापूर-552 30)वर्धा- 264 31)लातूर -286 32)वाशिम-182 33)नागपूर-405 34)यवतमाळ -505 नोकरभरतीला सध्या अडथळ्यांची शर्यत पार पडावी लागत आहे. जालना निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी जिल्ह्यात तलाठी भरती प्रक्रिया किंवा त्या संबंधीची परीक्षा वगळता अन्य नोकरभरती प्रक्रिया होत नसल्याचे सांगत विधान परिषदेच्या निवडणूक आचारसंहितेनंतरच ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचे म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
Ganesh Naik on Eknath Shinde: बिल्डरांच्या नादी लागून या लोकांनी महाराष्ट्र 10 वर्षे मागे नेला; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा, नेमकं काय म्हणाले?
बिल्डरांच्या नादी लागून या लोकांनी महाराष्ट्र 10 वर्षे मागे नेला; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा, नेमकं काय म्हणाले?
Gadchiroli Snake Bite Student Death: सळसळत आला, हळूहळू दंश करत सुटला; सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, 3 जणांवर उपचार सुरु, गडचिरोलीतील आश्रमशाळेत मध्यरात्री काय घडलं?
सळसळत आला, हळूहळू दंश करत सुटला; सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू, 3 जणांवर उपचार सुरु, गडचिरोलीतील आश्रमशाळेत मध्यरात्री काय घडलं?

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Embed widget