एक्स्प्लोर

Pooja Chavan Death Case | शांताबाई राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा; पूजाच्या आई-वडिलांची मागणी

Pooja Chavan Death Case : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पूजाच्या आई-वडिलांनी संजय राठोड यांच्याकडून पैसे घेतल्याचा दावा पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी केला होता. अशातच आता शांताबाई राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी पूजाच्या आई-वडिलांनी केली आहे.

बीड : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पूजाच्या आई-वडिलांनी पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी केला होता. हा आरोप बदनामीकारक आणि बेछुट आहे. हा आरोप करणारी महिला शांताबाई राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पूजाच्या वडिलांनी आता परळी पोलिसांकडे धाव‌ घेतली आहे. आज त्यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आमच्यावर आरोप करणारी महिला शांताबाई राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत पूजाचे वडील लहु चव्हाण यांनी केली आहे.

पूजाच्या आईवडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये पोहोचवले, आजी शांताबाई राठोड यांचा गौप्यस्फोट 

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन राज्यात वादंग उठलं आहे. या घटनेला आज 19 दिवस उलटून गेले आहेत. काल शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी या प्रकरणात राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. या प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. काल या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांचा गुन्हा काल पुण्यातील वानवडी पोलिसांनी दाखल करुन घेतला नाही. तक्रार दाखल करुन घेतलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान आता शांताबाई राठोड यांनी एक नवा गौप्यस्फोट केला आहे. पूजाच्या आई-वडिलांना संजय राठोड यांनी पाच कोटी रुपये पोहोचवले ,त्यामुळेच त्यांना पूजाच्या हत्याऱ्याविषयी बोलायचे नाही आणि पैशामुळे माझे चुलत आजी नातेही त्यांना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी पूजाच्या आई वडिलांनी दिलेल्या खोट्या माहितीला बळी पडू नये आणि पूजाला न्याय द्यावा, अशी मागणी शांताबाई यांनी केली आहे.

शांताबाई म्हणाल्या की, ज्या आई-वडिलांना पैशांसमोर स्वतःच्या मुलीची किंमत वाटत नाही, तर मी चुलत आजी कुठली कोण? पूजाच्या आईवडिलांनी समाजाची दिशाभूल तर केलीच आता मुख्यमंत्र्यांची ही दिशाभूल करत आहेत. संजय राठोड यांनी पूजाच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचा आवाज बंद केला आहे. त्यामुळे पूजाचे आई-वडील कधीही समोर येऊन संजय राठोड यांच्या विरोधात आवाज उठवणार नाही. आमची मुलगी आजारी होती आणि त्यानेच ती मेली असेच ते म्हणतील, असा गौप्यस्फोट शांताबाई राठोड यांनी केला आहे.

पूजाची आजी आमच्या दूरच्या नातेवाईक, मात्र आमच्यात कसलेच नातेसंबंध नाहीत : पूजाचे वडिल

"आता कोण काय बोलतंय हे माहित नाही, आम्ही आमच्या दुःखात आहोत." मुख्यमंत्र्यांनी सांगूनही बदनामी थांबली नाही, अशी खंतही पूजाच्या वडिलांनी बोलताना व्यक्त केली. तसेच संजय राठोड यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप करणाऱ्या आजींबाबत बोलताना, त्या आमच्या दूरच्या नातेवाईक आहेत, मात्र आमच्यात कसलेच नातेसंबंध नाहीत, असं पूजाच्या वडिलांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Sagar Mali Passes Away: मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
Pune News : पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवणाऱ्या पुण्यातील 'त्या' अंगणवाडी सेविकेला दिलासा, टीकेची झोड उठताच सेवामुक्तीची कारवाई अखेर रद्द, नेमकं प्रकरण काय?
पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवणाऱ्या पुण्यातील 'त्या' अंगणवाडी सेविकेला अखेर दिलासा, टीकेची झोड उठताच सेवामुक्तीची कारवाई रद्द, नेमकं प्रकरण काय?
Chatro Ki Gunj Pune : 'तु जाने ना...' गाण्यावर प्रणिती शिंदे, विशाल पाटलांसह काँग्रेसचे सगळेच नेते थिरकले; राहुल गांधींचा पुण्यातील ‘छात्रों की गुंज’चा शेवट जल्लोषात
'तु जाने ना...' गाण्यावर प्रणिती शिंदे, विशाल पाटलांसह काँग्रेसचे सगळेच नेते थिरकले; राहुल गांधींचा पुण्यातील ‘छात्रों की गुंज’चा शेवट जल्लोषात

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget