एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गोंदियात नक्षलींचा घातपाताचा कट उधळला, पुलाखालून स्फोटकं जप्त
एका जर्मनच्या डब्यात नक्षलवाद्यांनी स्फोटकं लपवली होती. भूसुरुंग स्फोट घडवून आणण्यासाठी या स्फोटकांचा वापर करण्यात येणार होता
गोंदिया : गडचिरोलीत आयईडी स्फोट घडवून केलेल्या घातपाताची पुनरावृत्ती गोंदियात घडवण्याचा नक्षलवाद्यांचा मनसुबा पोलिसांनी उधळला आहे. गोंदियात टेकाटोला ते मुरुकडोह दंडारी गावाच्या नाल्यावरील पुलाखाली मोठ्या प्रमाणावर लपवलेली स्फोटकं पोलिसांनी जप्त केली आहेत.
एका जर्मनच्या डब्यात नक्षलवाद्यांनी स्फोटकं लपवली होती. भूसुरुंग स्फोट घडवून आणण्यासाठी या स्फोटकांचा वापर करण्यात येणार होता, अशी माहिती आहे. मात्र हे साहित्य पोलिसांनी जप्त करुन नक्षल्यांनी रचलेला घातपाताचा कट उलथला आहे. सालेकसा पोलिस स्टेशनअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
महाराष्ट्र दिनी नक्षलींनी गडचिरोलीतील जांबुडखेडा मार्गावरील लेंडारी पुलावर भीषण स्फोट घडवला होता. या दुर्घटनेत गडचिरोली पोलिसांच्या शीघ्र कृती दलाच्या 15 जवानांसह एका खाजगी वाहन चालकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिस विभागाने सीमावर्ती भागात रेड अलर्ट जारी केला होता. गोंदिया पोलिसांनीही जंगल परिसर आणि दुर्गम भागातील रस्त्यांवरील पुलांखाली शोधमोहीम राबवली.
प्रफुल दादा, कुरखेडा मार्गावर आम्ही यशस्वी झालो, गडचिरोलीच्या रस्त्यावर गूढ संदेश
सालेकसा पोलिसांना टेकाटोला ते मुरकडोह दंडारी गावाच्या रस्त्यावरील पुलाखाली एका जर्मन डब्यात भूसुरुंग स्फोट घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात लपवून ठेवलेलं नक्षल साहित्य जप्त करण्यात यश आलं. मागील आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यातील एका जहाल नक्षलवाद्याने गोंदिया पोलिसांना समोर आत्मसमर्पण केलं होतं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement