एक्स्प्लोर

राज्यात लवकरच 10 हजार जागांसाठी पोलीस भरती, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

गृह विभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या 8 हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी 2 हजार जागा वाढवून एकूण 10 हजार पोलीस शिपाई भरती करण्याचे व ही भरतीप्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

मुंबई : राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलिस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा फायदा शहरी व ग्रामीण तरुणांना होईल, त्यांना पोलीस दलात सेवेची संधी मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज महत्वाची बैठक झाली. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवास, एसआरपीएफच्या अपर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत गृह विभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या 8 हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी 2 हजार जागा वाढवून एकूण 10 हजार पोलीस शिपाई भरती करण्याचे व ही भरतीप्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर ही भरतीप्रक्रीया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल, याचा विचार करुन सर्वकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. मंत्रिमंडळ मंजूरीनंतर भरतीप्रक्रियेची कार्यवाही वेग घेईल, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.

राज्यात 10 हजार पोलीस शिपायांची भरती करण्याबरोबरच नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याच्या निर्णयावरही आज उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या बटालियनसाठी 1384 पदे निर्माण करण्यात येणार असून प्रत्येक टप्प्यात 461 प्रमाणे 3 टप्प्यात ही पदे भरण्यात येणार आहेत. यातूनही शहरी व ग्रामीण युवतींना पोलीस सेवेची संधी मिळणार असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील सण, उत्सव, सामाजिक-राजकीय मोर्चांमध्ये महिलांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे. उपराजधानी नागपूरची भौगोलिक स्थिती, रेल्वे, विमान व दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता लक्षात घेवून एसआरपीएफच्या या केंद्रासाठी नागपूर जिल्ह्याची शिफारस करण्यात आली होती. त्याअनुषंगाने काटोल गावच्या हद्दीत शासकीय जमीन उपलब्ध असल्याने त्याठिकाणी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे. आजच्या या निर्णयांमुळे राज्यातील युवक, युवतींना पोलीस सेवेत दाखल होण्याची संधी मिळेलच, त्याचबरोबर पोलिसांवरील ताण कमी होण्यास, कायदा-सुव्यवस्था अधिक भक्कम होण्यास मदत होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar on Maharashtra Election : इकडं अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच तिकडं शरद पवारांचा थेट एल्गार! म्हणाले तरी काय?
इकडं अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच तिकडं शरद पवारांचा थेट एल्गार! म्हणाले तरी काय?
क्रिकेटचे शूज किती रुपयांना येतात? विराट कोहलीच्या शूजची किंमत काय?
क्रिकेटचे शूज किती रुपयांना येतात? विराट कोहलीच्या शूजची किंमत काय?
Pune Metro: PM मोदींची पुण्यात सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीच साम्राज्य, पाहा फोटो
PM मोदींची पुण्यात सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीच साम्राज्य, पाहा फोटो
आमचं ठरलंय कोणाकडून निवडणूक लढवायची; बदलत्या राजकारणावर धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
आमचं ठरलंय कोणाकडून निवडणूक लढवायची; बदलत्या राजकारणावर धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM : 25 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सManoj Jarange Protest : नऊ दिवसानंतर मनोज जरांगे पाटलांचे उपोषण अखेर स्थगितMaharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Headlines : 03 PM : 25 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar on Maharashtra Election : इकडं अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच तिकडं शरद पवारांचा थेट एल्गार! म्हणाले तरी काय?
इकडं अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असतानाच तिकडं शरद पवारांचा थेट एल्गार! म्हणाले तरी काय?
क्रिकेटचे शूज किती रुपयांना येतात? विराट कोहलीच्या शूजची किंमत काय?
क्रिकेटचे शूज किती रुपयांना येतात? विराट कोहलीच्या शूजची किंमत काय?
Pune Metro: PM मोदींची पुण्यात सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीच साम्राज्य, पाहा फोटो
PM मोदींची पुण्यात सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीच साम्राज्य, पाहा फोटो
आमचं ठरलंय कोणाकडून निवडणूक लढवायची; बदलत्या राजकारणावर धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
आमचं ठरलंय कोणाकडून निवडणूक लढवायची; बदलत्या राजकारणावर धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
PM Modi Pune Visit: पुण्यात मुसळधार पाऊस! उद्या पंतप्रधानांची सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीच साम्राज्य, पाहा व्हिडिओ
पुण्यात मुसळधार पाऊस! उद्या पंतप्रधानांची सभा होणार त्या ठिकाणी चिखल अन् दलदलीच साम्राज्य, पाहा व्हिडिओ
देशाच्या कोणत्याच भागाला पाकिस्तान म्हणता येणार नाही, सुप्रीम कोर्टाने फटकारताच न्यायमूर्तींचा डबल माफीनामा; महिला वकिलावरही अश्लील कमेंट
देशाच्या कोणत्याच भागाला पाकिस्तान म्हणता येणार नाही, सुप्रीम कोर्टाने फटकारताच न्यायमूर्तींचा डबल माफीनामा; महिला वकिलावरही अश्लील कमेंट
लाचखोर निलंबित IAS अधिकारी अनिल रामोड यांची पुन्हा नियुक्ती; शासनाने दिली मोठी जबाबदारी
लाचखोर निलंबित IAS अधिकारी अनिल रामोड यांची पुन्हा नियुक्ती; शासनाने दिली मोठी जबाबदारी
Pune Metro: आरारा...लख्खं आरसाच जणू.. स्वारगेट मेट्रोच्या अंडरग्राउंड स्टेशनचे फोटो आले समोर; उद्घाटनापूर्वी पाहा फोटो
आरारा...लख्खं आरसाच जणू.. स्वारगेट मेट्रोच्या अंडरग्राउंड स्टेशनचे फोटो आले समोर; उद्घाटनापूर्वी पाहा फोटो
Embed widget