एक्स्प्लोर
पोलिसांनी धक्काबुक्की करत, गचांडी धरली; अजित नवलेंचा आरोप
सांगलीहून सोलापूरला आलेले अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते अजित नवले यांच्या नेतृत्त्वात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन करणार होते.
सोलापूर : पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप किसान सभेचे नेते अजित नवले यांनी केला आहे. एवढंच नाही तर पोलीस निरीक्षक नरसिंह अंकुशकर यांनी गचांडी धरुन ओढत नेल्याचा दावाही नवलेंनी केला. सोलापूरमध्ये सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला.
सांगलीहून सोलापूरला आलेले अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकर्ते अजित नवले यांच्या नेतृत्त्वात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन करणार होते. परंतु होटगी रोडवर पोलिसांनी आंदोलकांच्या गाड्या रोखल्या. याचवेळी पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप अजित नवले यांनी केला आहे. पोलिसांच्या दडपशाहीमुळे किसान सभेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली.
सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गासाठी अधिग्रहित झालेल्या जमिनीचा मोबदला तातडीने मिळावा. 2013 च्या परिपत्रकाप्रमाणे जमिनीचा मोबदला द्यावा, या प्रमुख मागणीसाठी सोलापूर ते सांगली असं आंदोलन करण्यात आलं होतं. कार्यकर्ते आज शेवटच्या दिवशी सुभाष देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन करणार होते. मात्र सोलापूर पोलिसांनी कार्यकर्त्यांना मध्येच रोखलं. गाड्या सोडून आंदोलक पायी निघाले. जवळपास दीड हजार कार्यकर्ते चालत सहकार मंत्र्यांच्या घराकडे निघाले होते. तेव्हाच पोलिसांनी मला आणि कार्यकर्त्यांना रोखलं आणि गचांडी पकडून गाडीत भरलं, असा आरोप अजित नवले यांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement