एक्स्प्लोर
आयपीएस ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पोलिसांवर हल्ल्याप्रकरणी मटका बुकीसह चौघांना अटक
कोल्हापूरमधील यादव नगरात ही थरारक घटना घडली होती. या चौघांना ताब्यात घेतल्यामुळे आता अटक झालेल्यांची संख्या 25 वर गेली आहे. आज या चौघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

कोल्हापूर : कोल्हापुरातील यादवनगर परिसरात माजी महापौरांच्या पतीच्या मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा टाकण्यासाठी गेलेल्या कोल्हापूरच्या प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पोलीस पथकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी मटका बुकी सलीम मुल्ला याच्यासह आणखी चार साथीदारांना अटक केली आहे. पोलिसांनी सुरक्षा रक्षक निरंजन पाटील यांच्याकडून पळवून नेलेले सर्व्हिस रिव्हॉल्वर देखील हस्तगत केले आहे. कोल्हापूरमधील यादव नगरात ही थरारक घटना घडली होती. या चौघांना ताब्यात घेतल्यामुळे आता अटक झालेल्यांची संख्या 25 वर गेली आहे. आज या चौघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणी काल माजी उपमहापौर शमा मुल्ला यांच्यासह 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. VIDEO | कोल्हापुरात माजी उपमहापौर पतीच्या मटका अड्ड्यावर छापा, जमावाचा पोलिसांवर हल्ला | एबीपी माझा काल माजी महापौरांच्या पतीच्या मटका अड्ड्यावर पोलीस गेले असता तिथं त्यांना बुकिंगचे रजिस्टर आणि पैसे आढळून आले होते. अड्ड्यावर पोलिसांची धाड पडल्याचे समजताच माजी उपमहापौर शमा मुल्ला त्यांचे पती समीर मुल्ला यांच्यासह परिसरातील महिला आणि युवकांनी धाड टाकायला आलेल्या प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना जोरदार धक्काबुक्की केली होती. यावेळी प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यावर हल्ला करत एका युवकाने ऐश्वर्या शर्मा यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावून घेत त्यांच्यावर रोखून धरली होती. कोल्हापूरच्या यादवनगरमध्ये राष्ट्रवादीच्या माजी उपमहापौर शमा मुल्ला यांचे पती सलीम मुल्ला हे मटक्याच्या व्यवसाय करतात. ज्यावेळी पोलीस शमा मुल्ला यांच्या घरी झाडाझडती करायला गेले त्यावेळी पोलिसांना जोरदार धक्काबुकी झाली होती. यामध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्याची माहिती कळताच तात्काळ कोल्हापूर पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आणि पोलिस उपअधीक्षक तिरुपती काकडे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी जाऊन शमा मुल्लांसह 15 जण ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर पोलिसांकडून मुल्लांच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी पोलिसांना मटका, जुगार आणि सावरकरकीची कोही आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली होती. दरम्यान, पोलिसांची जादा कुमक आल्याचे दिसताच समीर मुल्ला आणि काही हल्लेखोर फरार झाले होते.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग






















