एक्स्प्लोर
‘मोदी आले तरी चालतील, पण सर्वसामान्यांसाठी साईंचं दर्शन बंद ठेवू नका’
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्तानं शिर्डी दौऱ्यावर येत आहेत.
शिर्डी: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्तानं शिर्डी दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान ज्यावेळी साईबाबा समाधी मंदिरात दर्शनासाठी येतील, त्यावेळी इतर भविकांनाही दर्शन घेता येईलं, अशी माहिती शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली. त्या एबीपी माझाशी बोलत होत्या.
मोदी शिर्डीत येत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सर्वसामान्य भाविकांना प्रवेश नाकारण्यात येणार अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र पंतप्रधान कार्यलयातूनच भाविकांना त्रास होणार नाही असे नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. उत्सव काळात 5 ते 7 लाख भाविक साईबाबांचे दर्शन घेतील असा अंदाज आहे.
उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शताब्दी वर्षाचा ध्वजावतरणाने समारोप होणार आहे. त्यानंतर दर्शनबारीसह विविध विकास कामांच भूमीपूजन केलं जाणार आहे.
दरम्यान, उद्याच्या कार्यक्रमासाठी शिर्डी संस्थानचे सुरक्षा रक्षक आणि पोलिस कर्मचारी असा 4 ते 5 हजार कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शिर्डीत भक्तांची गर्दी
फकिराच्या रुपात आपलं संपूर्ण जीवन व्यतित करणाऱ्या साईबाबांना वंदन करत, हजारो भाविक आज शिर्डीत दाखल झाले. साईबाबांच्या समाधीला आज शंभर वर्ष पूर्ण झाले असून, आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे.
सबका मालिक एक असा संदेश संपूर्ण जगाला देणाऱ्या साईबाबांनी 15 ऑक्टोबर 1918 रोजी दसऱ्याच्या दिवशी महासमाधी घेतली. साईबाबांची जीवनशैली अत्यंत साधी सरळ होती. पाच घरी भिक्षा मागून जे मिळेल ते अगोदर पशू, प्राण्यांना आणि भुकेलेल्यांना वाटून देत, त्यानंतरच स्वत: ग्रहण करत असत. आजही साईबाबा संस्थानने बाबांच्या भिक्षा झोळीची परंपरा अविरतपणे सुरु ठेवली आहे. साईंच्या आगमनाअगोदर महिला रांगोळीने रस्ता सजवतात तर निषाणाची आरती करून हळद-कुंकू वाहून भिक्षेकऱ्याचं स्वागत केलं जातं. देशभरातून आलेले साईभक्त, ग्रामस्थही मोठ्या प्रमाणात यात सहभागी होऊन दारोदार फिरुन भिक्षा गोळा करतात.
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यासह विश्वस्त भिक्षा झोळीत सहभागी झाले होते. आपल्या दारात भिक्षा मागण्यासाठी आजही साईबाबा भिक्षेकऱ्याच्या रुपात येतात अशी श्रद्धा ठेऊन ग्रामस्थ साईच्या झोळीत भरभरुन दान देतात. पैसे, गहू, बाजरी, ज्वारी अशा विवीध स्वरुपात ही भिक्षा दिली जाते. साईबाबा संस्थानला हजारो क्विंटल धान्य भाविक दान करतात. हेच धान्य प्रसादभोजनासाठी वर्षभर वापरलं जातं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement