एक्स्प्लोर
बघ्यांच्या गर्दीमुळे अग्निशमन दलाच्या जवानासह एका कामगाराचा मृत्यू; पिंपरी-चिंचवडमधील दुर्घटना
ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या तीन अग्निशामक जवानांच्या अंगावर मातीचा ढिगारा पडला. या मातीच्या ढिगाऱ्याखाली चार जण गाडले गेले. या घटनेत पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या जवानासह कामगाराचा मृत्यू झाला आहे.
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये सुरु असलेल्या अमृत योजनेच्या कामावेळी खड्ड्यात अडकलेल्या कामगाराला बाहेर काढताना अग्निशमन दलाच्या एका जवानासह एका कमागाराच मृत्यू झाला आहे. सुदैवाने दोन जवान अन दोन तरुण बचावले. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून दापोडीत अमृत योजनेअंतर्गत खोदकाम सुरू आहे. ही घटना रविवारी ( 1 डिसेंबर) सायंकाळी सव्वासहा वाजता घडली. घटना घडल्यानंतर याठिकाणी एनडीआरएफ दाखल झाले होते. त्यांनी त्वरित मतदकार्य सुरु केले होते.
बघ्यांच्या गर्दीचा आततायीपणा अग्निशमन दलाच्या जवनासह एका कामगाराच्या जीवावर बेतला असून सुदैवाने दोन जवान आणि दोन तरुणांना जीवदान मिळालं आहे. ही धक्कादायक आणि दुर्दैवी घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून दापोडी येथे अमृत योजनेअंतर्गत नागेश जमादार हे कामगार त्या 15 फूट खड्ड्यात काम करत होते. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास अचानक त्यांच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळल्याने ते कंबरेपर्यंत गाडले गेले. त्यांना बाहेर काढण्यासाठी ईश्वर बडगे आणि सीताराम सुरवसे हे स्थानिक नागरिक खाली उतरले. बघता बघता ही बातमी वाऱ्यासरखी पसरली आणि त्याठिकाणी बघ्यांची गर्दी वाढली. वाढलेल्या गर्दीने बचावकार्यात अडथळा निर्माण होत होता.
बघता-बघता ईश्वर आणि सीताराम यांनी नागेशच्या कंबरेपर्यंतची माती बाजूला केली. तितक्यात सायंकाळी 6 वाजता अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी पोहचले. सरोज पुंडे, निखिल गोगावले आणि विशाल जाधव या तिन्ही जवानांनी बचावकार्य सुरू केलं. तिन्ही जवानांनी अगदी गुडघ्यापर्यंतची माती बाजूला केली. ठेकेदार एम बी पाटीलच्या हलगर्जीपणामुळे हा प्रसंग नागेशवर ओढवला होता. अवघ्या पंधरा मिनिटांत बचावकार्य संपणार होतं. मात्र बघ्यांचा आततायीपणा वाढला आणि त्या सर्वांच्या पायाने पुन्हा मातीचा ढिगारा या तिन्ही जवानांसह नागेशच्या अंगावर कोसळला. सहाही जण गाडले गेले. मग आणखी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं. ईश्वर आणि सीताराम वरच्याच बाजूला असल्याने त्यांना शिडीच्या साह्याने बाहेर काढण्यात आलं. तसेच काहीवेळाने सरोज आणि निखिल या दोन्ही जवानांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. पण दुर्दैवाने विशाल जाधव यात शहीद झाले. तर मध्यरात्री साडे तीन वाजता नागेशचा मृतदेह एनडीआरएफ आणि लष्कराच्या तुकडीने बाहेर काढला. बघ्यांनी आणखी पंधरा मिनिटं कळ सोसली असती तर विशाल आणि नागेश आज आपल्यात असते. तेंव्हा अशी कोणतीही घटना घडल्यास बचावकार्यात तुम्ही अडथळा ठरणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे.
शहीद विशाल जाधव यांचा जन्म हा साताऱ्यातील फलटण येथे झाला. त्यांचे वडील हे मुंबई पोलीसमध्ये कार्यरत होते. त्यामुळे त्यांचं शिक्षण हे मुंबईतच झालं. पिंपरी चिंचवड अग्निशमन दलात ते 26 डिसेंबर 2012 ला रुजू झाले होते. तेंव्हापासून ते इथेच कार्यरत असून, रहायला मोशी येथे आहेत. मोशीत ते पत्नी आणि 2 वर्षांच्या मुलीसह राहत होते. आता त्यांचा अंत्यविधी हा मूळगावी होणार आहे.
दोषींवर कारवाई होणार
घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले आहे. या घटनेचा तपास सुरु आहे, जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती डीसीपी स्मिता पाटील यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी ठेकेदाराच्या सुपरव्हायजरला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पाहा व्हिडीओ : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराला वाचवताना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement