एक्स्प्लोर
पिंपरीत लग्नातल्या आईस्क्रिममधून 56 जणांना विषबाधा
![पिंपरीत लग्नातल्या आईस्क्रिममधून 56 जणांना विषबाधा Pimpari Food Poisoning After Eating Ice Cream In Wedding Latest News पिंपरीत लग्नातल्या आईस्क्रिममधून 56 जणांना विषबाधा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/22202150/Pimpari-Food-Poison.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये लग्नातील आईस्क्रिममधून 56 वऱ्हाडींना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. रहाटणीतल्या थोपटे लॉन्समध्ये रविवारी रात्री ही घटना घडली.
संध्याकाळी लग्नात आईस्क्रिम खाल्ल्यानंतर लहान मुलांना उलट्या होऊ लागल्या. उन्हामुळे हा त्रास झाला असावा असा अंदाज, सुरुवातीला वर्तवण्यात आला. मात्र काही वेळातच मोठ्यांनाही उलट्यांचा त्रास झाल्यानं सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
एकूण 56 जणांना विषबाधा झाली असून औंध जिल्हा रुग्णालय तसंच वायसीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. विषबाधा झालेल्यांपैकी अकरा महिन्याच्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. वाकड पोलिसांनी केटरर्सच्या मालकासह आईस्क्रिम पार्लरवाल्याला ताब्यात घेतलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)