एक्स्प्लोर
महापौर बनण्याआधीच नितीन काळजे यांचं नगरसेवकपद धोक्यात
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतिहासात भाजपचा पहिला महापौर विराजमान होणार आहे. मात्र त्याआधीच महापौरपदाचे उमेदवार नितीन काळजे यांचं नगरसेवकपद धोक्यात आलं आहे.
नितीन काळजे यांनी ओबीसी जागेवर निवडणूक लढवताना, कुणबी ओबीसीचं बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप, राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार घनश्याम खेडकर यांनी केला आहे. तसंच यासंदर्भात खेडकर यांनी हायकोर्टात याचिकाही दाखल केली आहे.
महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने नितीन काळजे यांचा अर्ज बाद करण्याची मागणीही घनश्याम खेडकर यांनी केली आहे. बहुमत असल्याने भाजपचे नितीन काळजे महापौर होतीलही, मात्र आरोप सिद्ध झाल्यास महापौर होण्याचं त्यांचं स्वप्न भंग होऊ शकतं.
दुसरीकडे नितीन काळजे यांनी घनश्याम खेडकर यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
मात्र भाजपचा पहिला महापौर बनून इतिहास घडवण्यापूर्वीच नितीन काळजेंना हे विघ्न पार करावे लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement