एक्स्प्लोर
चिकनच्या पैशांवरुन वाद, पिंपरीत दुकानदाराचा ग्राहकावर हल्ला

आरोपी अजीज शेख
पिंपरी चिंचवड : चिकन घेताना झालेल्या पैशांच्या वादावरुन दुकानात काम करणाऱ्याने ग्राहकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना पिंपरीत समोर आली आहे. हल्ल्यात निलेश ढवळे हा तरुण जखमी झाला आहे. अजीज शेख हा पिंपरी चिंचवडमधील पुनावळे भागातल्या एका चिकन सेंटरमध्ये कामाला आहे. निलेश ढवळे हा युवक दुकानात चिकन घेण्यासाठी आला होता. तेव्हा अजीजने एका ग्राहकाकडून 310 रुपये घेतले, तर तितक्याच वजनाच्या चिकनसाठी आपल्याकडून मात्र 410 रुपये घेतल्याचा दावा निलेशने केला. याबाबत निलेशने जाब विचारला असता दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी निलेश दुकानातील काही अंडी आणि वजनाचा काटा तोडल्याची माहिती आहे. त्यामुळे चिडलेल्या अजिजने हातातील सत्तूरने निलेशच्या डोक्यात वार केल्याचा आरोप आहे. यामध्ये निलेश जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत, तर आरोपी अजीजला हिंजेवडी पोलिसांनी अटक केली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























