एक्स्प्लोर
मामासोबत गावी निघालेल्या 13 वर्षीय मुलाचा रेल्वेतून पडून मृत्यू
महत्त्वाचं म्हणजे भाचा खाली पडल्याची चाहूलही मामाला लागली नाही.

पिंपरी चिंचवड : मामाच्या गावी निघालेल्या 13 वर्षीय मुलाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. चिंचवडमध्ये आज सकाळी नऊ वाजता ही घटना घडली. अर्जुन रमेशराव असं दुर्दैवी मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. डोंबिवलीहून इंद्रायणी एक्सप्रेसने तो मामासोबत सोलापूरला निघाला होता. पण आज सकाळी रेल्वे चिंचवडमध्ये पोहोचली तेव्हा गाडीच्या दारातून तोल जाऊन अर्जुन अचानक खाली पडला. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. महत्त्वाचं म्हणजे भाचा खाली पडल्याची चाहूलही मामाला लागली नाही. रेल्वे पोलिसांनी कुटुंबीयांशी संपर्क साधल्यानंतर मामाच्या कानावर ही बाब पडली. तोपर्यंत मामा बराच पुढे गेला होता. दरम्यान, लोहमार्ग पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
निवडणूक























