एक्स्प्लोर
पिंपरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने कुटुंबावर हल्ला, पत्नीची 4 बोटं तुटली!
पिंपरी चिंचवड : पिंपरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अज्ञातांनी कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पती, पत्नी जखमी झाले असून, पत्नीच्या डाव्या हाताची चार बोटं तुटली आहेत.
पिंपरीतील देहूरोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत नायडूनगर ते माळवाडी परिसरात रात्री सव्वा बाराच्या सुमारास ही घटना घडली.
महेंद्र काळोखे आणि राणी काळोखे असं जखमी झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे. तर त्यांचा मुलगा सुखरुप आहे. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
काळोखे कुटुंब कारने निघालं होतं. त्याचवेळी पत्ता विचारण्यासाठी बाईकवरुन आलेल्या दोघांनी कार थांबवली. त्यानंतर हल्लेखोरांनी तलवार आणि काठ्यांनी हल्ला केला.
या प्रकरणी देहूरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून हल्लेखोर फरार आहेत. काळोखे कुटुंब हे माळवाडी येथील रहिवासी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement