एक्स्प्लोर

दक्षिणेत दोन वेगवेगळ्या अपघातात बीड-लातूरचे 78 भाविक बचावले

आंध्र प्रदेशातील श्रीशैल्यमच्या घाटांमध्ये 36 भाविकांना नेणारी बस दरीत कोसळताना वाचली, तर तामिळनाडूत बसला लागलेल्या आगीतून 42 जण सुखरुप बचावले. हे सर्व भाविक लातूर आणि बीडचे रहिवासी होते

बीड : दक्षिण भारतात घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये बीड आणि लातूरचे 78 भाविक बालंबाल बचावले. आंध्र प्रदेशातील श्रीशैल्यमच्या घाटांमध्ये 36 भाविकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळताना वाचली, तर तामिळनाडूत बसला लागलेल्या आगीतून 42 जण सुखरुप बचावले. या दोन्ही अपघातात बचावलेले भाविक हे बीड आणि लातूर जिल्ह्यातले होते. दोन धाम तीर्थयात्रेवर निघालेल्या लातूर जिल्ह्यातल्या भाविकांच्या खाजगी बसला आग लागली होती. या बसमध्ये असलेले लातूरच्या निलंगा निटूर रेणापूर तसेच बीडच्या अंबाजोगाई परिसरातले एकूण 42 भाविक सुदैवाने सुखरुप बचावले. तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूरचे दर्शन घेऊन इंदूरच्या अन्नपूर्णा ट्रॅव्हल्सची ही बस निघाली. बंगळुरु-कन्याकुमारी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वरुन ही बस भाविकांना घेऊन कन्याकुमारीला निघाली होती. पहाटे चार वाजताच्या सुमारास तामिळनाडूतील दिडिंगलजवळ या बसने अचानक पेट घेतला. ही आग इतकी भीषण होती की यात गाडीतले सगळे सामान जळून खाक झालं. यामध्ये बस, सात लाख रुपये, भाविकांचे कपडे आणि स्वयंपाकासाठी नेलेले साहित्याचा समावेश आहे. या भाविकांच्या अंगावर केवळ कपडे उरले होते. जवळच्या ग्रामस्थांनी या भाविकांच्या निवासाची आणि भोजनाची सोय केली. दुसरी घटना आंध्रप्रदेशात श्रीशैलमच्या घाटात घडली. केवळ बसच्या दोन टायरवर ही बस दरीत कोसळता-कोसळता वाचली. या बसने बीड जिल्ह्यातल्या परळीमधले 36 भाविक श्रीशैलमसाठी निघाले होते. बसने काल सकाळी सहाच्या सुमारास श्री शिंदेंच्या दोरणाला फॉरेस्ट विभागाचा टोलनाका पार केला. चिन्नाररुट वनक्षेत्रात प्रवेश केल्यानंतर घाटातून जात असताना बसचे ब्रेक निकामी झाले आणि ती रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण भिंतीला जाऊन धडकली. बस घाटातून खाली दरीत कोसळत असतानाच अचानक थांबली. या घटनेचा थरार इतका भीषण होता की बसच्या मागच्या दोन चाकावर ती उभी राहिली या बसमध्ये असलेले 36 प्रवासी बचावले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला अद्याप पोलिसांची परवानगी नाही, प्रशांत जगताप दंड थोपटत म्हणाले....
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला अद्याप पोलिसांची परवानगी नाही, प्रशांत जगताप दंड थोपटत म्हणाले....
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Embed widget