एक्स्प्लोर

साखर कारखाना विक्री घोटाळा : शरद पवारांवर अण्णांनी केलेल्या आरोपांची काय चौकशी केली?, हायकोर्टाचा सवाल

या घोटाळ्यामुळे सहकार चळवळीला गालबोट लावत राज्य सरकारचा सुमारे 25 हजार कोटींचा महसूल बुडवला आहे, असा आरोप करत अण्णा हजारे यांनी साल 2016 मध्ये हायकोर्टात फौजदारी जनहित याचिका दाखल केली होती.

मुंबई : राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांची बेकायदेशीर पद्धतीने विक्री करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे. तसेच अनेक कारखान्यांचे बेकायदेशीर पद्धतीने खासगीकरणही करण्यात आले. या सर्व घोटाळ्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार व अजित पवार यांचा हात आहे’, असा आरोप करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर काय कारवाई केली?,असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मुंबईतील एमआरए मार्ग पोलिसांना केला आहे. त्याचबरोबर यासंदर्भातील आतापर्यंतच्या चौकशीच्या प्रगती अहवालासह तपास अधिकाऱ्याला 8 मार्चला होणाऱ्या पुढील सुनावणीस हायकोर्टात हजर राहण्याचे निर्देशही दिलेले आहेत. या घोटाळ्यामुळे सहकार चळवळीला गालबोट लावत राज्य सरकारचा सुमारे 25 हजार कोटींचा महसूल बुडवला आहे, असा आरोप करत अण्णा हजारे यांनी साल  2016 मध्ये हायकोर्टात फौजदारी जनहित याचिका दाखल केली होती. मात्र,यासंदर्भात आधी पोलिसांत तक्रार द्यावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्यानं अण्णांनी क्रॉफर्ड मार्केटजवळील एमआरए मार्ग पोलिसांत रीतसर तक्रार नोंदवली होती. परंतु, ‘आता दोन वर्षे उलटली तरी पोलिसांनी त्या तक्रारीवर काहीच केले नाही’, असे शुक्रवारी हायकोर्टाच्या निर्दशनास आणून देण्यात आले. ही ‘तक्रार प्रभावशाली व्यक्तींविरुद्ध असल्याने पोलीस कारवाई करत नसून चौकशी न होण्यामागची काय कारणं आहेत?’अशी विचारणा अण्णांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहून केल्याकडे वकीलांनी हायकोर्टाचे लक्ष वेधले. तेव्हा या प्रश्नाची दखल घेत मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठानं सरकारी वकीलांना चौकशीच्या प्रगतीबद्दल विचारणा केली. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर देता न आल्यानं हायकोर्टानं संबंधित तपास अधिकाऱ्याला चौकशीच्या प्रगती अहवालासह 8 मार्चला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीलाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 07 January 2025Dhananjay Deshmukh : संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणारJob Majha : युको बँकेत नोकरीची संधी, अटी काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
Embed widget