एक्स्प्लोर

वारिस पठाणांविरोधात भाजप आक्रमक, औरंगाबादेत प्रतिकात्मक पुतळा दहन

वारिस पठाण यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. औरंगाबादेत पठाण यांच्याविरोधात भाजप रस्त्यावर उतरली आहे.

मुंबई : आम्ही 15 कोटी 100 कोटींवर भारी आहेत असं चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या वारिस पठाणांविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. महाराष्ट्रात वारिस पठाणांच्या सभांवर बंदी घालावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. शिवाय वारिस पठाण यांच्या वक्तव्यावर भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही जोरदार टीका केली आहे. कर्नाटकातल्या गुलबर्गा शहरात सीएए आणि एनआरसीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. आझादी मिळत नसेल तर ती हिसकावून घेऊ असंही यावेळी वारिस पठाण म्हणाले. एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटायला सुरुवात झाली आहे. औरंगाबादेत पठाण यांच्याविरोधात भाजप रस्त्यावर उतरली आहे. वारिस पठाण यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून भाजपनं त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. या आंदोलनात आमदार अतुल सावे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. वारिस पठाण यांना तडीपार करा नाहीतर तुरुंगात टाका अशी मागणी यावेळी भाजपनं केली आहे. MIM | आम्ही 15 कोटी असलो तरी 100 कोटींना भारी, एमआयएम नेत्याचे चिथावणीखोर वक्तव्य वारिस पठाण यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. तर वारीस पठाण यांच्यावर असदुद्दीन ओवेसी यांनी कारवाई करावी आणि त्यांना पक्षातून काढावं तसेच माध्यमांसमोर येऊन सर्व जनतेची माफी मागावी अशा प्रतिक्रिया मुंबई बाग येथे बसलेल्या आंदोलकांनी व्यक्त केल्या आहे. तर वारिस पठाण यांच्या विरोधात पोलीसात तक्रारही नोंदवुन त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगितले काय म्हणाले होते वारीस पठाण ? आम्ही 15 कोटी मुस्लीम असलो, तरी 100 कोटींना भारी आहोत. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांनी 15 फेब्रुवारीला हे वक्तव्य केलं. विशेष म्हणजे याप्रसंगी एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची देखील उपस्थिती होती. मात्र, त्यांनी या वक्तव्यावर कुठलाही आक्षेप घेतल्याचे पाहायला मिळाले नाही. "केवळ शब्दांनी उत्तर देता येणार नाही, विटेला दगडाने उत्तर देणं आम्ही शिकलोय. मात्र, एकत्र होऊन चालावं लागेल. स्वातंत्र्य घ्यावं लागेल आणि जी गोष्ट मागितल्याने मिळत नाही, ती हिसकावून घ्यावी लागेल. हे लक्षात असू द्या. आता वेळ आलीय. आम्हाला म्हणाले महिलांना पुढं केलं, आता तर फक्त वाघिणी बाहेर निघाल्या तरी तुम्हाला घाम फुटला. मग विचार करा आम्ही सोबत आलो तर काय होईल. 15 कोटी आहोत पण 100 कोटींना भारी पडू, लक्षात ठेवा, असं पठाण यावेळी म्हणाले. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिलंय. संबंधित बातम्या : आम्ही 15 कोटी असलो तरी 100 कोटींना भारी आहोत, एमआयएम नेत्याचे चिथावणीखोर वक्तव्य Shaheen bagh : शाहीन बाग आंदोलनाविरोधात दाखल याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी

महत्त्वाच्या बातम्या

ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget