एक्स्प्लोर

आम्ही 15 कोटी असलो तरी 100 कोटींना भारी आहोत, एमआयएम नेत्याचे चिथावणीखोर वक्तव्य

एमआयएम नेते वारीस पठाण यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. आम्ही 15 कोटी मुस्लीम असलो तरी, 100 कोटीं भारी आहोत, असं चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केलंय.

गुलबर्गा : आम्ही 15 कोटी आहोत. मात्र, 100 कोटींवर भारी आहोत, असं चिथावणीखोर वक्तव्य एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांनी केलंय. इट का जबाब पत्थर से देना हम सिख गए है. एवढंच नव्हे, तर स्वातंत्र्य मागितल्यानं मिळत नाही तर हिसकावून घ्यावं लागतं. मुस्लीम समाजाला चिथवणारी वक्तव्य वारीस पठाण यांनी कर्नाटकातल्या गुलबर्गामध्ये केली आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात वारिस पठाण बरळलेत. विशेष म्हणजे यावेळी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी देखील उपस्थित होते. वारिस पठणांच्या वक्तव्यानं वाद उफाळण्याची चिन्ह आहेत. काय म्हणाले वारिस पठाण? आम्ही 15 कोटी मुस्लीम असलो, तरी 100 कोटींना भारी आहोत. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांनी 15 फेब्रुवारीला हे वक्तव्य केलं. विशेष म्हणजे याप्रसंगी एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची देखील उपस्थिती होती. मात्र, त्यांनी या वक्तव्यावर कुठलाही आक्षेप घेतल्याचे पाहायला मिळाले नाही. "केवळ शब्दांनी उत्तर देता येणार नाही, विटेला दगडाने उत्तर देणं आम्ही शिकलोय. मात्र, एकत्र होऊन चालावं लागेल. स्वातंत्र्य घ्यावं लागेल आणि जी गोष्ट मागितल्याने मिळत नाही, ती हिसकावून घ्यावी लागेल. हे लक्षात असू द्या. आता वेळ आलीय. आम्हाला म्हणाले महिलांना पुढं केलं, आता तर फक्त वाघिणी बाहेर निघाल्या तरी तुम्हाला घाम फुटला. मग विचार करा आम्ही सोबत आलो तर काय होईल. 15 कोटी आहोत पण 100 कोटींना भारी पडू, लक्षात ठेवा, असं पठाण यावेळी म्हणाले. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिलंय. सामूहिक बलात्कारप्रकरणी भाजप आमदारासह सात जणांवर गुन्हा दाखल आम्ही 135 कोटी जगात भारी आहोत : शिवसेना आमदार अब्दुल सत्तार आम्ही 135 कोटी जगात भारी आहोत, भारतात सगळे हिंदुस्थानी राहतात, वारिस पठाण यांनी असं बोलणं योग्य नाही, त्यांनी शब्द परत घ्यावे, समाजात तेढ निर्माण करणे योग्य नाही. पठाण यांनी शिर्डीला जावे आणि श्रद्धा सबुरी शिकावी, यांचं हे बोलणं म्हणजे त्यांची ही वोट बँक आहे म्हणून ते तसं बोलतात. देश सगळ्यांचा आहे लक्षात ठेवा. वारीस पठाण हा तद्दन मूर्ख माणूस : जितेंद्र आव्हाड कोणताही मुस्लीम असं बोलू शकत नाही. इतके दिवस आंदोलन सुरू आहे. मात्र, कुठेही हिंसा झाली नाही. कारण हे आंदोलन संविधानासाठी सुरू आहे. त्याच्यात हे सुपारी मास्टर, भाजपच्या सांगण्यावरून बोलून वातावरण दूषित करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. मात्र, वारिस पठाण यांचं हे मुस्लीम समाज ऐकणार नाही. यांचं मुस्लीम समाजाने ऐकलं असतं तर ते निवडूण आले असते, असेही आव्हाड म्हणाले. वारीस पठाण यांच्या बोलण्याचा विपर्यास केला : इम्तियाज जलील वारीस पठाण यांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आलाय. त्यात तथ्य नाही. पंतप्रधान सगळ्यांचे आहेत, मग आमच्याकडे दुर्लक्ष का? आम्ही इतक्या दिवसांपासून सीएए विरोधात आंदोलन करतोय. मात्र, तुम्ही फक्त दुर्लक्ष करताय. भाषा वापरत असताना शब्दाचा वापर कसा करायचा हे आम्ही आमच्या लोकांना शिकवू. मात्र, मीडियाचा हा सिलेक्टिव्ह अॅप्रोच आहे. इतका जोश वारिस पठाण यांच्याबाबत दाखवता तितका अनुराग ठाकूर आणि योगी आदित्यनाथ यांच्याबाबत का दाखवत नाही? असाही सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला. वारिस पठाण यांच्या बोलण्याचं आम्ही समर्थन करत नाहीय. फक्त त्यांच्या बोलण्याचा अर्थ लोकांनी बदलला, ट्विस्ट केलं, आमच्या पक्षाचं धोरण स्पष्ट आहे. आम्ही सगळ्यांसोबत आहोत, त्यांच्या बोलण्याचे स्पष्टीकरण आम्ही त्यांना लिखित मागवू, पक्ष त्यांना याची विचारणा करेल, असं स्पष्टीकरण खासदार इम्तियाज जलील यांनी दिलंय. Citizenship Amendment Bill | नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर स्पष्टता हवी | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

 99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गाती लोकांनाच धुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
 99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गाती लोकांनाच धुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Embed widget