एक्स्प्लोर

रामटेक बंगला वापरल्याचे 15.50 लाख भरा, खडसेंना स्मरणपत्र

रक्कम भरण्याबाबतचं स्मरणपत्र सार्वजनिक बांधकाम खात्याकडून एकनाथ खडसेंना देण्यात आलं आहे.

मुंबई : मंत्रीपद गेल्यानंतरही शासकीय निवासस्थान रामटेक बंगला वापरल्याचे साडे पंधरा लाख रुपये भरा, अशी आठवण सार्वजनिक बांधकाम विभागाने भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना करुन दिली आहे. याबाबतचं स्मरणपत्र त्यांना देण्यात आलं आहे. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने ही माहिती दिली. अनिल गलगली यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना वितरित केलेला शासकीय बंगला 'रामटेक'बाबत माहिती विचारली होती. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी 4 जून 2016 रोजी राजीनाम्यानंतर 19 जून 2016 रोजी त्यांना बंगला रिक्त करणं आवश्यक होतं. माजी मंत्र्यांना पहिले 15 दिवस शासकीय निवासस्थान निःशुल्क असतं, त्यानंतर 3 महिन्यासाठी शासनाच्या परवानगीने प्रति वर्ग फुट 50 रुपये आणि त्यानंतर पुढील 3 महिन्यांसाठी 100 रुपये एवढा दंडनीय आकार निश्चित केला आहे. अनिल गलगली यांच्याच आरटीआयनंतर शासनाने खडसेंना 3 महिन्यांची परवानगी दिली होती. एकनाथ खडसे हे वास्तव्य करीत असलेले शासकीय निवासस्थान 'रामटेक' बंगला वापरापोटी असलेली दिनांक 19 नोव्हेंबर 2016 पर्यंत थकबाकी 15 लाख 49 हजार 975 रुपये आहे. ना.दा. मार्ग येथील शासकीय बंगला 'रामटेक' येथे एकनाथ खडसे, माजी मंत्री यांनी दिनांक 19 नोव्हेंबर 2014 मध्यान्ह पूर्व पासून बंगल्याचा ताबा घेतला होता. 19 नोव्हेंबर 2016 रोजी बंगल्याचा रिक्त ताबा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात दिलेला आहे. दरम्यान खडसे यांच्या थकबाकीची वसूली त्यांच्या वेतनातून वळते करण्याची मागणी अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. शिवाय संबंधितांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नव कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नव कुटुंब
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
Delhi Assembly Elections 2025 : लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray : बाळासाहेब होते तेव्हा इंडिया आघाडी नव्हती,त्यांच्या स्मारकाबाबत इंडिया आघाडीचं...Dhananjay Deshmukh Jalna : माझा जीव गेला तरी न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाहीVaibhavi Santosh Deshmukh माझ्या वडिलांना का मारलं.. संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावरMaharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 10 Jan ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नव कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नव कुटुंब
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
Delhi Assembly Elections 2025 : लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
Yuzvendra Chahal : लग्न नेमकं कोणामुळं मोडतंय? धनश्री प्रतीकसोबत दिसली, दुसरीकडे युझवेंद्र चहलही मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपवताना झाला स्पॉट!
लग्न नेमकं कोणामुळं मोडतंय? धनश्री प्रतीकसोबत दिसली, दुसरीकडे युझवेंद्र चहलही मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपवताना झाला स्पॉट!
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
Embed widget